सामाजिक बांधिलकी जपुन निर्भीड पणे लिखाण करणारे पञकार. परमेश्वर गोपतवाड.
समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवत सतत सामान्यांसाठी लेखणी जिझविणारे निर्भीड पञकार म्हणून सबंध जिल्हाभर परिचय असणारे परमेश्वर गोपतवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द व्रतपञ विक्रेता ते जेष्ट पञकार गोपतवाड.....
हिमायतनगर जांबुवंत मिराशे./यांचा वाढदिवस विशेष लेख .
तालुक्यातील सवना येथिल सर्व साधारण कुटुंबात २ मे १९६७ रोजी प्रमेश्वर गोपतवाड यांचा जन्म झाला त्यांची घरची हलाकीची परिस्थीती असल्यांने त्यांनी शालेय जिवन जगत असताना शहरात व्रतपञ वितरण करण्याचे काम चालु केले कालांतराने त्यांनी पुढे काही वर्षातच स्वता:अनुपमा न्युज पेपर या नावाने एजन्सी चालऊन भल्या पहाटे वाचकांना कश्या प्रकारे व्रतपञ वितरण करता येईल यासाठी त्यांच्या कडे कामाला असनार्या मुलांना मार्गदर्षन करुन आल्पअवधितच त्यांनी वाचकांचे मने जिंकलीत तदनंतर दै .प्रजावाणी या व्रतमान पञास लिखान करण्यास सुरवात केली मागील जवळपास विस वर्षा पासुन ते आजतगायत लोकप्रीय दैनिक दैशोन्नतीत तालुका प्रतिनीधी म्हनुन काम करतात या मुळे त्यांची राजकीय लोकांशी नेहमी सहवास येत असे म्हनुनच त्यांनी सर्व प्रथम सवना या गावची सोसायटीची निवडनुक लढऊन त्यांंनी आपले पँनल निवडुन आनले सतत तिस वर्षा पासुन ते चेअरमन म्हनुन काम करतात .व मागिल पंचवार्षीक निवडनुकीत त्यांनी पाच वर्ष सरपंच म्हनुन ही काम केले .तसेच त्यांनी क्रषी ऊत्पन बाजार समितीचे सभापती .खरेदी विक्री संघाचे संचालक . सभापती.संचालक या पदापर्यंत मजल मारली ते ही कुठलाही राजकीय वारसा नसताना. परमेश्वर गोपतवाड यांनी पञकारतेच्या धावत्या काळातही समाजातील तरूण वर्गाना मोलाचे मार्गदर्शन केले त्याबरोबरच आमच्या सारख्यांना हाताशी धरून पञकार म्हणून समाजातील घटना घडामोडींना वाचा फोडण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली.
आज ५५ वा वाढदिवस त्या निमित्त वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा दिर्घ आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना ....
आपला जांबुवंत मिराशे ९१ इंडीया न्यूज प्रतिनीधी .मा.ग्रा.प.सदस्य. संचालक सेवा सहकारी सोसायटी कारला