जिल्हा परिषद प्रार्थमीक शाळा परोटी.तांडा. येथे . सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
किनवट नांदेड,प्रतिनीधी..
किनवट तालुक्यातील परोटी तांडा ,येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 1. मे रोजी ध्वजारोहण करून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ शाळा सुंदर शाळा. बेटी पढाव बेटी बचाव, शेतकरी जगला पाहिजे, झाडे लावा झाडे जगवा, व देशभक्ती गाण्यासह बंजारा बोलीभाषेसह इतर गाण्यावर मुलामुलींनी नृत्य करून हा सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन येथील मुख्याध्यापक अनिरुद्ध राठोड, यांनी केले तर विविध गाण्यावर नृत्य बसवण्यासाठी येथील शिक्षक पांडुरंग शेरे, निलाताई पवार, यांनी परिश्रम घेतले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत कस्तुरे सर ,माने सर . ब्रह्मानंद चव्हाण ,यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पंडित यांनी केले या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम चव्हाण, यांच्यासह समिती सदस्य व गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.