Type Here to Get Search Results !

लाखनगाव मध्ये ग्रामदैवत सटवाई देवी यात्रा उत्सव

लाखनगाव मध्ये ग्रामदैवत सटवाई देवी यात्रा उत्सव



आंबेगाव तालुका प्रतिनिधी 
ता.१/५/२०२२ लाखणगाव ता. आंबेगाव ग्रामदैवत कुलस्वामिनी सटवाईदेवी यात्रा उत्सवाचे सोमवार दि. २/५/२०२२ते गुरुवार दि.५/५/२०२२पर्यंत विविध कार्यक्रमाचे चार दिवस आयोजन केले आहे अशी माहिती लाखणगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. प्राजक्ता शिरीषकुमार रोडे पा. यांनी दिली आहे. सोमवार दि.२/५/२०२२रोजी सकाळी ९ ते ११ बैलगाडा टोकण व सायंकाळी ६ वाजता देवीस हळद व चोळी पातळ मंगळवार दि.३/५/२०२२रोजी सकाळी ८ ते १०वाजता मांडव डहाळे व हार-तुरे, सकाळी १० ते ५ कलगी तुऱ्याचा जंगी सामना, सायंकाळी ५ वाजता देवीची शेरणी मिरवणूक 

विशेष आकर्षण महिला ढोल पथक,रात्री८ वाजता पालखी व काठीची मिरवणूक, रात्री १० वाजता सौ नंदाराणी भोकरे साकुर्डे कर सह उषा राणी खोमणे औरंगाबाद कर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. बुधवारदि.४/५/२०२२ रोजी सकाळी १० ते ६ बैलगाड्यांच्या शर्यती, सायंकाळी ६ वाजता चांँदशहावली बाबांचा संदल, गुरुवार दि.५/५/२०२२ रोजी चांँदशहावली बाबांचा उरूस, दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा, रात्री १० वाजता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. 

यात्रेचे नियोजन उपसरपंच श्री.बाळासाहेब धरम, मा. सरपंच श्री.दस्तगीरभाई मुजावर, मा. उपसरपंच श्री.प्रमोद भागवत, भाऊसाहेब दौंड, मा. उपसरपंच श्री.मार्तंड टाव्हरे, महादेव कानसकर, माजी सरपंच किसन टव्हारे,मा. उपसरपंच सौ.वंदना पडवळ, मा. उपसरपंच सौ.सुवर्णा पडवळ, मा. उपसरपंच सौ.अर्चना दौंड, ग्रा.पं. सदस्या सौ.साधना आरगडे, ग्रा.पं.सदस्या सौ. दीपाली वाघमारे व समस्त ग्रामस्थ लाखणगाव पाहत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad