Type Here to Get Search Results !

बेल्हा जेजुरी रस्त्यावर लोणी येथे अपघात दोघे जण जखमी

बेल्हा जेजुरी रस्त्यावर लोणी येथे अपघात दोघे जण जखमी



आंबेगाव तालुका प्रतिनिधी कैलास गायकवाड
  दिः३०/०४/२०२२. बेल्हे( ता.जुन्नर) ते जेजूरी (ता.पुरंधर ) रस्त्यावर लोणी (ता.आंबेगाव ) येथे खडकवाडी फाटा ( चिमटा ) येथे शुक्रवार ( दिः२९) रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास चार चाकी व दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन तीन जण जखमी झाले आहेत.त्यामुळे हा रस्ता तयार झाल्या पासून जे अपघाताचे सत्र सुरु झाले आहे ते थांबता थांबेना. इरटिका कार एमएच-१४, एचके-५२३९ दत्तात्रेय हरिभाऊ कड हे कार घेऊन पारनेर वरून खडकवाडी-लोणी मार्गे चाकणला चालली होती.

तर दुचाकी एमएच-१४, डल्ल्यू-१५२० हि लोणीवरून खडकवाडीला चालली होती.लोणी खडकवाडी रस्त्यावर ( चिमटा ) येथील वळणावर दोन्ही वाहानाची समोरा समोर धडक होऊन तीन जण जखमी झाले आहेत. जखमी मध्ये मीना रामदास सुक्रे, अभिषेक रामदास सुक्रे व एक मुलगी जखमी झाली आहे. जखमीना चाकण येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये आहे. इरटिका कारमध्ये दोन जण होते.तर दुचाकीवर एक मुलगा व दोन महिला होत्या.

कारचालक यांनी प्रसंगाअवधान राखून कार रस्त्याच्या उजव्या बाजूला वळवली व कार झाडाला जाऊन धडकली.कार मधील दोघानाही काही झाले नाही. बेल्हा जेजूरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यापासून थापेवाडी ते खडकवाडी फाटा ( चिमटा ) या दरम्यान अनेक वेळा अपघात झाले आहेत. अपघाताचे कारण म्हणजे वाहानाचा वेग. खडकवाडी फाटा(चिमटा) येथील वळणावर त्वरीत सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसवावा अशी मागणी खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके व वाळुंजनगरचे माजी उपसरपंच महेंद्र वाळुंज यांनी केली आहे. 

 : लोणी (ता.आंबेगाव ) येथील खडकवाडी फाटा ( चिमटा ) येथे अपघातग्रस्त इरटिका कार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies