यात्रा उत्सवाचे व बैलगाडा घाटाचे उदघाटन विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते.
बेलसरवाडी (निरगुडसर) ता.आंबेगाव राज्याचे गृहमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्व.दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील बैलगाडा घाटाचे व भैरवनाथ यात्रा उत्सवाचे उद्घाटन आज पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, शरद बँक सहकारी बँक नवनिर्वाचित उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.प्रमोद वळसे पाटील, मा.सरपंच रामदासशेठ वळसे पाटील, फकिराशेठ वळसे पाटील, शामराव टाव्हरे, यात्रा कमीटीचे अध्यक्ष मा.रामशेठ गावडे, उद्योजक मा.काकासाहेब गवळी, यशवंत गावडे, पांडूशेठ गावडे, डॉ शांताराम गावडे, सयाजी टाव्हरे, कचरदास कुरकुटे, सुधीर गावडे, अक्षय पोखरकर, संतोष कुरकुटे, बाळासाहेब टाव्हरे, संतोष हिंगे, यात्रा कमिटीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.