डिजिटल इंडिया मध्ये ऑनलाईन फ्रॉडचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट
जनता सध्या लॉकडाऊन च्या संकटातून स्वतःला सावरत आहेत परंतु यात आत्ता एक नवीन संकट समोर येत आहे ते म्हणजे ऑनलाईन फ्रॉड चे ,आपण प्ले स्टोअरवर वरून जे ॲप घेतो ते नीट न पाहता त्याला पट पट करून सर्व्या परवानग्या आपण देऊन टाकतो याचाच हे फ्रॉड फायदा उचलत आहेत ,
परवानगी धिल्या मुळे मोबाईल मधील काँटॅक्ट लिस्ट ही त्यांना सहज मिळते त्या कॉन्टॅक्ट लिस्ट ते घेऊन नंतर ते लोकांना ब्लॅक मेल करत आहेत, व्यक्तींन कडून जबर दस्ती पैसे माघत आहेत जर नाही म्हटले तर ते मोबाईल मधील कॉन्टॅक्ट लिस्ट दाखून जर तुम्ही पैसे नाय भरले तुम्हाला आम्ही बदनाम करू तुमच्या मोबाईल मधील सर्व लोकांना मेसेज करू तुमचे फोटो , व्हिडिओ , मेसेज पाठू , अश्या ते धमक्या देत आहेत
आणि खूप लोक आपली बदनामी होईल या भीतीने या लोकांना पैसे देत आहेत , परंतु या गोष्टींना कोणीही घाबरून न जाता त्वरित आपल्या जवळील पोलीस स्टशनमध्ये त्या विषयी तक्रार करावी कोणी ही या लोकांना पैसे देऊ नयेत अशी पोलीस प्रशासन आणि सायबर सेल च्या वतीने जनतेला विनंती करण्यात येत आहे.