जन्मदात्या पित्यानेच केला 6 वर्षाचे मुलीवर अतिप्रसंग
प्रतिनिधी निंगनुर मैनोदिन सौदागर ता.उमरखेड जि यवतमाळ.
परिसरातील हिरामण नगर येथील संतोष राठोड वय 30 वर्षे याने त्याची स्वतःची मुलगी वय 6 वर्षे ही सोबत झोपली असता दि 2 मे च्या रात्री 12 वाजताचे दरम्यान पोटच्या गोळ्या सोबत अतिप्रसंग केला असल्याची संतापजनक घटना घडली.
तसेच ही घटना कोणाला सांगशील तर जिवाने मारून टाकील अशी धमकी दिली. भीतीचे पोटी तिने कोणाला काही नाही सांगितले परंतु पीडितला त्रास होत असल्याने तिने तिच्या आईला सांगितले. पिडीतेचा प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणून उपचार केला.
व रात्री पोलीस स्टेशन बिटरगाव येथे पिडीत मुलीच्या आईने पती संतोष राठोड याचे विरुद्ध तक्रार दिल्यावरून अप नं. १२२/२०२२ कलम 376(2)(फ)376(2)(आय )506 भादवी सह कलम 4, 6 पोक्सो प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. व आरोपीला तात्काळ अटक केली.
पुढील तपास ठाणेदार प्रताप दत्ताञय भोस यांचे मार्गदर्शनमध्ये पोउपनि कपिल मस्के बिटजमादार गजानन खरात. निलेश भालेराव. मोहन चाटे.पोलीस शिपाई सतीश चव्हाण .हाके करत आहे