संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेस जिल्ह्यातून मनसे सैनिक जाणार-जिल्हाध्यक्ष शेख राज यांची माहिती
सेलू (प्रतिनिधि) : महाराष्ट्र दिनी संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी परभणी जिल्ह्य़ातील असंख्य महाराष्ट्र सैनिक जाणार आसल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष शेख राज यांनी शनिवार 23 रोजी आयोजीत कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली.
जिल्ह्याभरातून राज ठाकरे यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक या सभेला जाण्याची तयारी करण्यात आली आहे.या बैठकीस जिल्हा संघटक, गुलाबराव रोडगे, जिल्हा सचिव गणेश भिसे,जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भुमरे,सेलू तालुका अध्यक्ष निजलींगअप्पा तरवडगे, जिंतूर तालुका अध्यक्ष ओंकार देशमाने, सेलू शहर अध्यक्ष गणेश निवळकर, शहर उपाध्यक्ष सय्यद जावेद व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थित होती.
प्रतिनिधी तथागत आवचार सेलू जी परभणी