Type Here to Get Search Results !

विराट कोहली पकलाय त्याला विश्रांतीची गरज; रवी शास्त्रींचा सल्ला

विराट कोहली पकलाय त्याला विश्रांतीची गरज; रवी शास्त्रींचा सल्ला


विराट कोहली आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये फॉर्म अतिशय खराब सुरु आहे. 19 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला (Virat Kohli) काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की बायो बबलच्या निर्बंधांदरम्यान, खेळाडूंची काळजी घेतली पाहिजे. रवी शास्त्री (Ravi Shashtri) म्हणाले की विराट कोहलीचे अजून सहा-सात वर्षांचे क्रिकेट बाकी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर जास्त जोर टाकून फायदा नाहीये. भारताच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कोहलीला विश्रांती देण्यात यावी, असे ते म्हणाले. सततच्या टीका आणि अपेक्षांच्या ओझ्याने तो थकला आहे.

रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना सांगितले की, 'मी प्रशिक्षक असताना हे सर्व सुरू झाले. तुम्हाला खेळाडूंबद्दल सहानुभूती असायला हवी, हे मी पहिल्यांदा म्हणालो होते. जर तुम्ही आग्रह धरला तर, खेळाडूने हार मानतो किंवा आश्चर्यकारक कामगिरी करतो. त्यामुळे तुम्हाला खूप समज दाखवावी लागते.


विराट कोहलीचा संदर्भ देत ते म्हणाले, विराट कोहली पकला आहे. जर कोणाला विश्रांतीची गरज असेल तर तो कोहली आहे. दोन महिने असो किंवा दीड महिना, इंग्लंड दौऱ्यापूर्वी असो वा नंतर, त्याला ब्रेक मिळायला हवा. त्यांला विश्रांतीची गरज आहे कारण त्याच्यात अजून सहा-सात वर्षांचे क्रिकेट बाकी आहे . तो एकटा नाही. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अशी एक-दोन नावे असू शकतात. तुम्हाला समस्येचा सामना करावा लागेल.
आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या. त्याने आरसीबी आणि टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले आहे पण त्यामुळे त्याच्या खेळात काही विशेष फरक दिसून आला नाही. त्याला या मोसमात सात सामन्यांत 19.83 च्या माफक सरासरीने 119 धावा करता आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad