Type Here to Get Search Results !

महागाव | फुलसावंगी परिसरात विजेचा लपंडाव | विजेवर आधारित व्यवसाय ठप्प

▪️फुलसावंगी परिसरात विजेचा लपंडाव. ▪️विजेवर आधारित व्यवसाय ठप्प
माहागाव प्रतिनिधी / संजय जाधव


गेल्या काही दिवसापासून फुलसावंगी व परिसरात विजेचा लंपडाव सुरु असल्याने येथील नागरिक कमालीचे ञस्त झाले आहेत.या विजेच्या लंपडावाने येथील विजेवर आधारित असलेल्या अनेक व्यवसायावर मोठा परिणाम दिसून येत आहे.त्यामुळे व्यवसायीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.विजेच्या लपंडावात टि.व्ही.फ्रिज आदी उपकरणे नादुरूस्त होत आहेत.विजेचा पुरवठा सातत्याने खंडीत होत असताना महावितरणकडून वीज देयकांच्या वसुलीवरच भर दिला जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा महावितरणच्या विरोधात रोष दिसून येत आहे.

 

परंतु हा सर्व प्रकार बघता येथील महावितरण कर्यालयामध्ये पाहिजे त्या प्रमाणात कर्मचारी नसल्यामुळे अनेक अडचणी ना येथील कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.जवळपास ४२ गावांचा भार हा केवळ ८ ते ९ कर्मचाऱ्यांवर आहे.त्यामुळे एखाद्या ठिकाण चा विद्युत पुरवठा खंडीत झाला तर तो पुर्वरत करण्यासाठी बराच कालावधी लागतो.कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे विजेची कामे त्वरीत होत नसून त्याचा फटका हा ग्रामस्थांना बसत आहे.त्यामुळे फुलसावंगी फिडरला आवश्यक असलेले कर्मचारी शासनाने उपलब्ध करून दिल्यास नक्कीच ज्या समस्या आहेत त्या निकाली लागतील.

▪️विज पुरवाठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करू...शे.फैजान

दि.03 एप्रिल पासून मुस्लिम समाजातील पविञ अशा रमजान महिन्यास सुरूवात झाली आहे.मुस्लिम समाजातील लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वच या पवित्र महिन्यात अतिशय कठीण स्वरूपाचे असणारे रोजे(उपवास) धरतात.त्यातच या वर्षी प्रचंड प्रमाणात उष्णतेत वाढ झाली आहे.दुपारच्या वेळी थोडा आराम जरी करायचं मनल तर विजेचा पुरवठा सुरळीत नसतो.दर पंधरा ते विस मिनिटांनी विजेचा पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे गोरगरिब लोकांना या अनियमीत भारनियमनचा ञास होत आहे.त्यामुळे येथील शे.फैजान एम आय एम शहर अध्यक्ष यांनी महावितरण कार्यलयास निवेदन दिले.व विज पुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad