Type Here to Get Search Results !

महागाव | फुलसावंगी येथे शांतता समिती ची सभा संपन्न

फुलसावंगी येथे शांतता समिती ची सभा संपन्न

महागाव प्रतिनिधी :-संजय जाधव

फुलसावंगी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या प्रांगणात आज २ वाजता डॉ दिलीप भुजबळ पाटील जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षते खाली शांतता समिती ची सभा संपन्न झाली फुलसावंगी हे गाव शासन दरबारी अति संवेदनशील गाव म्हणून नोंद असल्यामुळे पुढे होऊ घातलेले सण श्रीराम नवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, महावीर जयंती, रमजान ईद हे सर्व सण शांततेत पार पाडा,असे आवाहन डॉ भुजबळ पाटील यांनी केले मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कोणतेही सण साजरे करता आले नाही या वेळी राज्य शासनाने कोरोना वरील सर्व निर्बंध हटविले त्यामुळे वरील सण उत्साहात आणि शांततेत पार पाडा असे आव्हाहन त्यांनी यावेळी केले.


यावेळी गावतील लोकांनी १) लोडशेडिंग बंद करणे,२)गावात झालेल्या अग्नी तांडवातील आरोपींना शोधून काढणे ३) परिसरातील राहुर ,शिरफुल्ली, शिरमाळ हे गावे महागाव तालुक्यात असुन सुद्धा राहुर हे गाव बिटरगाव पोलीस स्टेशन तर शिरफुल्ली आणि शिरमाळ हे दराटी पोलीस स्टेशन ला जोडलेले आहेत ते महागाव पोलीस स्टेशन ला जोडण्यात यावेत आणि ५) फुलसावंगी ची पोलीस चौकी अधिकृत करून योग्य ते पोलिस बल कायम ठेवावे इत्यादी मागण्या जनते ने केल्या

यावेळी डॉ दिलीप भुजबळ पाटील जि पो अधीक्षक, प्रदीप मडावी उपविभागीय पो अधिकारी उमरखेड,विलास चव्हाण महागाव ठाणेदार,भरत चपाईतकर,ठाणेदार दाराटी , राहुल वानखेडे, निलेश पेंढारकर, मार्कंडे, सह राजेश नाईक पो पाटील,विजय महाजन, डॉ.इरफान कुंदन, नवाब जानी कमर बेग, रवींद्र पांडे,अजय देशपांडे, निलेश जैस्वाल,योगेश वाजपेयी,बाबुराव व्हडगिरे, डॉ इरफान कुंदन,बाबू पठाण,कुनाल नाईक,याकूब लाला पत्रकार संघाचे सर्व सदस्य सह शेकडो गावकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad