किनवट तालुक्यातील ईस्लापुर ग्रामपंचायत मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
नांदेड प्रतिनीधी..
ईस्लापुर येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात उपसरपंच सौ. निर्मलाबाई दुरपडे यांच्या हस्ते थोर व्यक्तिमत्व महात्मा जोतीबा फुले. यांच्या प्रतिमेचा प्रथम पूजा-अर्चा करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी गर्दसवार ,ग्रा.पं सदस्य नारायण दंतलवाड,तुकाराम बोनगीर, नारायण शिंगारे, बालाजी दुरपुडे ,आडेली पोहेकर, साहेबराव मैत्रे, उत्तम चव्हाण, पत्रकार परमेश्वर पेशवे ,प्रमोद जाधव, आदी उपस्थित होते..