Type Here to Get Search Results !

उमरखेड | निगंनुर जि. परिषद प्राथमिक उर्दू शाळेत गणवेश वाटप

निगंनुर जि. परिषद प्राथमिक उर्दू शाळेत गणवेश वाटप


प्रतिनिधी निगंनुर.ता उमरखेड जि यवतमाळ
अति ग्रामीण भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथे आज दि.१/०४/२०२२ रोजी शाळेत मोफत गणवेश वाटप करण्यात आले शाळा समितीचे. अध्यक्ष अनसार खाँन, उप अध्यक्ष अतिक अलि नवाब.शिक्षण तज्ञ .मुसाखाँन केंद्र प्रमुख रामदास केंन्द्रे सर व ग्रामपंचायतचे सरपंच सुरेश बरडे .उपसरपंच मेहमुनिसाबेग वलिउल्हाखाँन. सदस्य. अंकुश राठोड.बालाजी महाले. बाळू जाधव यांचे उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.


गावातील प्राथमिक उर्दू शाळेत मुले-मुली शिक्षण घेत आहे. असे एकूण ३५ .विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले येथील जि.प.उर्दू शाळेचे असलेले मुख्याध्यापक मजहर नवाब . व शिक्षकवृंद खुपच चिकाटीने व जिद्दीने काम करुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहे. गावाच्या आजुबाजुला मराठी व माध्यमाच्या मोठमोठ्या शाळा आहेत त्यातच गावाची लोकसंख्या भरपूर असतांना सुध्दा शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक शेख उमर.हे रात्रंदिवस मेहनत घेऊन काम करत आहे. अशातच त्यांना गावातील तरुणांची साथ मिळाल्यामुळे शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, वेगवेगळे उपक्रम राबवुन शाळेचा दर्जा उंचवण्याचे काम गावातील ग्रामस्थ,तरुण व शिक्षक वृंद करीत आहे.


जिल्हा परिषदेकडुन दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप केले जातात. त्याप्रमाणे आज शाळेत गणवेशाचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक इमरानखाँन.जमीलखाँन. आगाखाँन . दिलावरखाँन.समदखाँन.विजय देवकते. सुनील बरडे. नयुम आलि नवाब.आसिफखाँन.आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad