Type Here to Get Search Results !

अकोला | ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथेला आरंभ

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद् भागवत कथेला आरंभ



अकोला - अकोला येथील लहान उमरी मधील क्रांतीज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले सभागृह येथे परिसरातील भाविकांचे माध्यमातून दिनांक 2-4 -2022 ते 9-4 -2022 पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीतमय सदृश्य श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आली असून ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज नावकार यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे व ह भ प श्री गणेश महाराज शेटे यांच्या रसमय वाणीतून श्रीमत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे

सप्ताहामध्ये सकाळी पाच ते सहा काकडा भजन, सकाळी आठ ते बारा व दुपारी तीन ते पाच पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत हरिपाठ, रात्री सात ते दहा वाजेपर्यंत संगीतमय श्रीमद् भागवत कथा अशा पद्धतीचे नियोजन राहणार आहे

कार्यक्रमाचे कलश पूजन श्री जयंतराव रामराव मसने मा सभापती ,सौ अर्चनाताई जयंतराव मसने महापौर मनपा अकोला यांच्या हस्ते असून कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार श्री रंधीरभाऊ सावरकर, माननीय श्री विजय अग्रवाल शहराध्यक्ष भाजपा क्षत्रिय माळी परिषद उमरी लहान येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक आठ एप्रिल रोजी सप्ताहामध्ये विष्णुसहस्त्रनाम ग्रंथपूजन व रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत संत गजानन महाराज यांचे सदृश्य चरित्र राहील सप्ताहाला सात संगत गायनाचार्य विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, तबलावादक विलास महाराज कराड ,हार्मोनियम वादक प्रदीप महाराज गायकवाड, दृश्य सजावट रामेश्वर महाराज गाढे व काल्याचे किर्तन ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज नावकार यांचे राहील अशी माहिती माहिती विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ आयोजक मंडळातर्फे देण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad