Type Here to Get Search Results !

आर्णी ! सावळी सदोबा सर्कल मधील रस्त्याच्या कामाची चौकशी करा ;- राजेश नागोसे गोवारी समाज संघटना अध्यक्ष यांची मागणी

सावळी सदोबा सर्कल मधील रस्त्याच्या कामाची चौकशी करा ;- राजेश नागोसे गोवारी समाज संघटना अध्यक्ष यांची मागणी 


 यवतमाळ- आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील नुकत्याच झालेल्या व सुरु असलेल्या सर्व रस्त्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी गोवारी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश नागोसे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे,


सावळी सदोबा सर्कल हा अतिदुर्गम सर्कल असल्याने "कोणी यावे भ्रष्टाचार करून जावे" उक्तीप्रमाणे रस्त्याचे काम चालू आहे, सावळी सदोबा सर्कल हे भ्रष्टाचाराचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे, संबंधित कंत्राटदार व अभियंता या दोघांच्या संगनमताने शासनाची तिजोरी लुटण्याचे काम चालू असल्याचे चित्र या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे,हा प्रकार नित्याचा असल्याचे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहेत.


 या भागात अनेक रस्त्यांची विकास कामे झाली असून,त्या कामाला सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे,या परिसरामध्ये झालेल्या कामाची गुणवत्ता विभाग परिसराकडे पाठविल्यास एकही काम गुणवत्तेच्या नुसार झालेले नाहीत, ऑइल मिक्षित डांबर,माती मिक्षित मरूम व इतर बोगस साहित्य वापरून शासनाची दिशाभूल करण्याचे काम या परिसरामध्ये होत असल्याने कोणतेच कामे इस्टिमेट नुसार न करता,थातुर- माथुर कामे करुन,निधी दडपण्याचे काम सदर कंत्राटदाराकडून केल्या जात आहे, त्यामुळे परिसरातील अनेक सामाजिक संघटना आंदोलनाच्या वाटेवर उतरण्याची तयारी चालू आहेत, 

अनेक वर्षापासून चांगल्या रस्त्याचे स्वप्न पहात असलेले नागरिक कंत्राटदाराकडून त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होताना दिसत आहे. रस्त्याच्या व इतर मागण्याचे निवेदन सावळी- ईचोरा सर्कल जनसंघर्ष कृती समितीचे संस्थापक राजेश नागोसे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad