Type Here to Get Search Results !

आंबेगाव ! लोणी ते पुणे पी.एम.पी.एम.एल बस सेवा सुरु

लोणी ते पुणे पी.एम.पी.एम.एल बस सेवा सुरु

 
लोणी धामणी प्रतिनिधी - कैलास गायकवाड ता.२/४/२०२२ लोणी तालुका आंबेगाव येथून लोणी ते पुणे व लोणी ते शिक्रापूर आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू झाली. लोणी व लोणी परिसरातील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करून लोणी ते पुणे बस सेवा सुरू केली आहे यासाठी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, गृह खात्याचे सहसचिव कैलास राव गायकवाड व परिसरातील कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

 


या बस सेवेमुळे लोणी धामणी वडगावपीर,मांदळेवाडी, रानमळा , वाळुंज नगर, खडकवाडी, सविंदणे, शिरदाळे पहाडदरा, पारगाव इत्यादी गावातील विद्यार्थी,कामगार व प्रवासी यांची मोठी सोय झाली आहे. लोणी हा परिसर बाजारपेठेचा असून, व्यापाऱ्यांची चांगली सोय झाली आहे.


 तसेच आजारी व्यक्तींना पुण्यात जाण्याकरिता चांगली सोय झाली आहे. बस सेवेचा शुभारंभ लोणी च्या सरपंच उर्मिला ताई धुमाळ यांच्या हस्ते नारळ फोडून झाला. यावेळी शरद सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष व लोणी चे माजी सरपंच उद्धवराव लंके, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रकाश वाळुंज पाटील, रांगोळी चित्र पंच राजुशेठ सिनलकर , माजी सरपंच दिलीप वाळुंज माजी उपसरपंच दिलीप आदक, उत्तम वादक, सतीश थोरात, समाज भूषण कैलासराव गायकवाड, पांडुरंग दिवटे, वाळू नंदूर चे माजी सरपंच शरद वाळुंज मधुकर रोकडे उपसरपंच अनिल पंचारास, माजी उपसरपंच राणीताई गायकवाड, राजेश सोनवणे, हैबत आढाव, बबन वाळुंज दगडू रणदिवे हजर होते. लोणी ते पुणे बस सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. 


यावेळी वाहक सचिन पाटील, व चालक वसंत बटुले यांचा ग्रामस्थांनी फेटा बांधून सत्कार केला. पेढे वाटून आनंद व्यक्त केला. बरेचशे ग्रामस्थांनी पाबळ पर्यंत प्रवास केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad