तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
प्रतिनिधी :- संतोष काळे
तंबाखू- व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असून युवा वर्गामध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कोलमडत असून हे थांबवण्यासाठी कोट्पा 2003 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर शंभरकर यांनी केले.
मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद व सोलापूर जिल्हा रुग्णालयाचा तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील शासकीय अधिकारी यांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त नितीन राऊत उपस्थित होते.
या कार्यशाळेत कोट्पा 2003 अंतर्गत कलम 4 व 6 त्याची माहिती राज्याधिकारी जिया शेख यांनी दिली. कलम पाच आणि सात यांची माहिती विभागीय अधिकारी अभिजित संघही यांनी दिली. डॉ. निलेश कोकरे यांनी तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या वतीने चालणाऱ्या उपक्रमाची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय अधिकारी रंगनाथ जोशी यांनी केले तर आभार समुपदेशिका मंजुश्री मुळे यांनी मानले यावेळी गणेश उगले अमित महाडिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.