अभिनेत्री अमिषा पटेल वर झाला गुन्हा दाखल
बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमिषा पटेल ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे आरोपही झाले आहेत. त्यापैकी एक आरोप म्हणजे चोरीचा. आताही अमिषा एका वेगळ्या आरोपासाठी चर्चेत आली आहे.
तो म्हणजे तिनं फसवणूक केल्याची तक्रार काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे अमिषावर गुन्हा दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अमिषा पटेलनं तीन मिनिटांसाठी चार लाख रूपये घेतल्याचे त्या आरोपामध्ये म्हटले आहे. तपासातून याबाबतची अधिक माहिती समोर येणार आहे.
खंडवामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी अमिषानं तीन मिनिटांच्या सादरीकरणासाठी चार लाख रुपये मागितले होते.पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर अमिषा पटेलची डोकेदुखी आणखी वाढली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी अमिषा पटेलचा खंडवा जिल्ह्यामध्ये देवी नवचंडी देवाधामच्यावतीनं एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्या कार्यक्रमामध्ये एक तासाच्या सादरीकरणासाठी अमिषानं चार लाख रुपये घेतले होते. मात्र तिनं केवळ तीन मिनिटांचे सादरीकरण करुन त्याठिकाणाहून पळ काढला. त्यामुळे आयोजकांनी नाराजी व्यक्त केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. एक तासाचे चार लाख सांगून प्रत्यक्षात तीन मिनिटेच थांबणाऱ्या अमिषा पटेलच्याविरोधात जाहीरपणे नाराजीही व्यक्त करण्यात आली होती.रविवारी अमिषाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो कार्यक्रम पाहण्यासाठी पाच ते सात हजारजण उपस्थित होते.
याप्रकरणी अमिषानं प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणते, माझ्या सुरक्षेचा मुद्दा होता. मला माझ्या जीवाची काळजी होती. म्हणून मी त्याठिकाणाहून निघाले. तिथली सुरक्षा व्यवस्था मला आवडली नाही. आयोजकांचे ढिसाळ नियोजन म्हणून मी तो कार्यक्रम लवकर सोडला. असेही अमिषानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन म्हटले आहे.