शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी बेमुदत उपोषण
तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेंतर्गत वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी उमरखेड तालुक्यातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक, चातारी येथे 25 एप्रिल रोजी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
पण उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही.भाजप कर्जमाफीची घोषणा केली पण या कर्जमाफी योजनेत उमरखेड तालुक्यातील बरेचशे शेतकरी वंचित ठेवण्यात आले आहे.
नंतर पुन्हा महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन झाले व त्यांनी दोन लाखांपर्यंत सरकारने सरसकट कर्जमाफी केली. पण यामध्ये उमरखेड तालुक्यातील शेतकरी वंचित ठेवण्यात आले. यासाठी 'प्रहार' शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल माने यांनी उमरखेड तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री साहेब ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला.
पण आजपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली नाही. येत्या आठवड्यात उमरखेड तालुक्यातील कर्जमाफी योजनेंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदत दिली नाही.
'प्रहार' शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर उमरखेड येथे मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्ते गणेशराव कदम, शामराव लुम्दे, भीमराव कदम, जयवंतराव कदम, वामन कदम, अशोक कदम, यांनी दिला.