परोटी येथे भीषण पाणीटंचाई प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष
किनवट प्रतिनिधी :- गजानन वानोळे
किनवट तालुक्यातील मौजे परोटी गाव हे आदिवासी पेसा अतंर्गत गाव असून, गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने अतिशय हालअपेष्टा सोसावे लागत आहे,
हे गाव पैनगंगा नदी काठापासून एक किलोमीटर अंतरावर असून, गावात पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही.
या गावात चारशे ते पाचशे लोकसंख्या असून लोकांना पिण्यासाठी पाणीच नाही, ग्रामपंचायतचा कार्यकाल 6 महिन्यापासून संपलेला आहे,
तरी संबंधित ग्रामसेवक व प्रशासक यांचे गावाकडे लक्षच नाही गावातील समस्या जाणून घेणे हे ग्रामसेवक व प्रशासक यांचे कर्तव्य असून हे गावाला भेट देत नाही असे मत येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहे.