Type Here to Get Search Results !

फलटणमधील निष्क्रीय वीज महावितरण अधिका-यांवर कारवाई करा - शेतकऱ्यांची मागणी

फलटणमधील निष्क्रीय वीज महावितरण अधिका-यांवर कारवाई करा : संतप्त शेतक-यांची मागणी



फलटण प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील मलवडी व वाठार निंबाळकर गावातील शेतक-यांनी सहनशीलतेची मर्यादा संपल्यानंतर आक्रमक होऊन एकजुटीने फलटण वीज महावितरणचे निष्क्रिय अधिकारी भरत खिलारे व सुरेश कुंभार यांचे निलंबन अथवा बदली करा अशा प्रकारची मागणी फलटण तालुक्यातील वीज महावितरणचे मुख्य अभियंता आवळेकर यांचेकडे केली आहे. निवेदन देताना सोबत शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे हे देखील फलटण तालुक्यातील शेतक-यांच्या बाजूने उपस्थित होते.
भरत खिलारे व सुरेश कुंभार या दोन्हीही अधिका-यांची शेतक-यांशी वागण्याची व वर्तणूकीची पद्धत अतिशय वाईट दर्जाची आहे. कामामध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई केली जाते. शेतक-यांच्या समस्येचे काहीच निवारण यांचेकडुन वेळेवर होत नाही. शेतक-यांशी बोलण्याची पद्धत उद्धट असते व उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जा तुला काय करायचं ते कर, कोणाकडे तक्रार करायची आहे ती कर असे उर्मठपणे शेतक-यांशी बोलतात. या दोन्ही अधिका-यांच्या निष्क्रियतेमुळे शेतपीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असुन आमचे भरुन न येण्यासारखे नुकसान होत आहे. तरी या दोन्ही निष्क्रिय अधिका-यांवर निलंबनाची अथवा बदलीची तातडीने कारवाई करावी अशी मागणी फलटण तालुक्याच्यावतीने सर्व शेतक-यांनी मुख्य अभियंता आवळेकर यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे आहे. तसेच भरत खिलारे हा अधिकारी फलटणमध्ये एकाच ठिकाणी तीन वर्षे पुर्ण झाली तरी इथे का आहे असे प्रश्नचिन्हही शेतक-यांनी दिलेल्या निवेदनात उपस्थित केले आहे.
फलटण तालुक्यातील सर्व क्षेत्रातील अधिकारी - कर्मचारी यांनी फलटण तालुक्यातील जनतेला नम्रतेने वागणूक देऊन नम्रपुर्वक सेवा द्यावी व त्यांच्या समस्येचे तातडीने निवारण करावे. कारण जनतेच्या सेवेसाठीच त्यांना महाराष्ट्र सरकारने नियुक्त केले आहे. त्यासाठी त्यांना योग्य तो मोबदला शासनाकडून दिला जातो. त्यामुळे येथुन पुढे कामाच्या दिरंगाईबाबत जनतेची तक्रार येणार नाही अशी अपेक्षा शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी फलटण तालुका प्रशासनाकडे व्यक्त केली आहे. तसेच सदर दोन्ही निष्क्रिय वीज महावितरण अधिकारी यांचेवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा फलटण वीज महावितरणला दिला आहे.
निवेदनावर सुरेश बिचूकले, हिंदुराव बिचूकले, शरद बिचूकले, गणपत बिचूकले, नानासाहेब बिचूकले, विलासराव बिचूकले, दादा बिचूकले, लक्ष्मण बिचूकले, अभिजीत भोसले, मयूर निंबाळकर यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad