प्रतिनिधी निंगनुर : -मैनोदिन सौदागर ता.उमरखेड जि.यवतमाळ
अचानक बदललेल्या हवामानामुळे निंगनूर परिसरात विजेच्या कडकडाटासह मध्यरात्री 2 वाजताचे सुमारास पाऊस पडला . निंगनूर शिवारातील रविंद्र पंडागळे यांच्या शेतात बांधलेल्या अंदाजे 7 वर्ष वय असलेल्या सुमारे 70 ते 80 हजार रुपये किंमतीच्या मुर्रा म्हशीवर वीज कोसळल्याने गाभन ( गर्भवती ) म्हैस जागीच गतप्राण झाली . पशु संवर्धन अधिकारी व तलाठ्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे .