अवकाळी पावसामुळे विद्युत तार तुटून दोन दुधाळ म्हैस आणि एक गाय दगावली
नांदेड ( किनवट,) प्रतिनिधी
किनवट तालुक्यातील मौजे दयाल धानोरा तांडा येथे तांड्यातील गायी म्हशीं पाळीव जनावराचा कळप चरण्यासाठी जात असताना गावा लागत असलेल्या नाल्याजवळच्या विद्युत खांबावरून तुटून पडलेल्या तारामुळे चरण्यास जाणाऱ्या दोन दुधाळ म्हशी व एका गाईला विद्युत प्रवाह ताराचा शॉक लागून जागीच हेरपळून मृत्यू झाल्याची घटना आज दि. २४ रविवार सकाळी 9 वाजनाच्या सुमारास घडली.यात लाईनमन च्या हलगर्जी पणामुळे सुमारे एक लाख चाळीस हजार रुपयांचे दुधाळ जनावरे दगावली असून, पशुपालकांनी विद्युत महावितरण कंपनी कडे नुकसान भरपाई मिळावी अशी चर्चा होत आहे. काल शनिवारच्या मध्यरात्री च्या नंतर शिवणी परिसर सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारा वादळ व पाऊस झाला.
ह्यात शिवणी परिसरातील मौजे दयाल धानोरा तांडा येथील एल.टी. लाईनचे विद्युत प्रवाह तार तुटून पडले होते सकाळी 9 च्या सुमारास येथील गायी म्हशी जनावरांचा कळप चरण्यासाठी जात असताना तांड्या लगत असलेले नाल्या लगत अचानक दोन दुधाळ म्हशी व एक गाय जागेवरच हेरपळत असताना गुरेराखेच्या निदर्शनास आले. बघता बघता यात दोन दुधाळ म्हैस व एक गाय यास तुटून पडलेल्या जिवंत विद्युत प्रवाह जनावरांना लागताच जागीच एक गाय व दोन दुधाळ म्हशीचे हेरपळून मृत्यू झाले.
यात पशुपालक धावजी डोहीफोडे, मौजे दयालधानोरा तांडा यांची पांढऱ्या रंगाची गाय तर मदन रतन राठोड व दत्ता जानु पवार ह्याची प्रत्येकी एक एक म्हैस असे एकून तीन पाळीव जनावरांचे शॉक लागून मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असे बोलले जात असून वरील पशुपालक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी चर्चा होत आहे.