Type Here to Get Search Results !

आंबेगाव | मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अभ्यासक्रमांना मान्यता

मंचर उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अभ्यासक्रमांना मान्यता...



आंबेगाव तालुका प्रतिनिधी ता.२४/४/२०२२

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय मंचर हे आंबेगाव व इतर आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना नेहमीच दर्जेदार सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहे. कोरोना कालावधीनंतर उपजिल्हा रुग्णलायात लहान मुलांचे अतिदक्षता विभाग, ट्रामा केअर, आय. सी. यु.युनिट पूर्ण क्षमतेने नव्याने रुग्णांना सेवा देत आहे. ना.वळसे पाटील साहेबांचे मार्गदर्शन, रुग्ण कल्याण समिती, वैद्यकीय अधीक्षक डॉ.नितीन देवमाने व रुग्णालयातील सर्व स्टाफ यांचे प्रयत्नातुन रुग्णालयामध्ये उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळेच मागील दोन महिन्यांपूर्वी रुग्णालयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालू करण्यासाठी सि.पी. एस. बोर्डामार्फत रुग्णालयाची चाचपणी करण्यात आली होती. त्यामध्ये रुग्णालयामध्ये आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता झाल्यामूळे रुग्णालयात चालू वर्षांपासून खालील अभ्यासक्रमांना मान्यता मिळालेली आहे.

1) एम.बी.बी.एस. डी.जी.ओ. (स्त्री रोग तज्ञ ) - 2 सीट
2) एम. बी. बी. एस. डी.सी. एच. (बालरोग तज्ञ) - 2 सीट
(3) एम. बी. बी. एस. डी. आर्थो. (अस्थी रोगतज्ञ) - 2 सीट
सदर अभ्यासक्रमासाठी निट परीक्षेतील गुणाणुक्रमांनुसार माहे जुन 2022 पासून शासनामार्फत प्रवेश दिला जाईल. त्यामुळे रुग्णालयात अतिरिक्त ६एम. बी. बी.एस .व त्यावरील तज्ञ शिकावू डॉक्टर उपलब्ध होतील. रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी याचा उपयोग होईल. नुकतेच शासनाने उपजिल्हा रुग्णालयात १०० बेड वाढवून 200 बेडच्या सामान्य रुग्णालयामध्ये दर्जा उंचावला आहे, त्यामूळे नजीकच्या काही दिवसांत अवसरी फाटा येथे भव्य रुग्णालय उभे राहणार आहे व त्यामध्ये आणखी पदव्युत्तर अभ्यासक्रमास शासनामार्फत मान्यता मिळविण्यासाठीचा मानस आहे.असे देवेंद्र शहा


 

सदस्य रुग्ण कल्याण समिती मंचर,अध्यक्ष शरद सहकारी बँकयांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News