शिवसेनेचं कार्य फलटण तालुक्यातील शेतक-यांच्या शेतपीकासाठी संजीवनी : प्रदिप झणझणे शिवसेना फलटण तालुका प्रमुख
फलटण प्रतिनिधी.विकास बेलदार
दिनांक 08/04/2022 रोजी फलटण तालुक्यातील नांदल येथील शेतक-यांसमवेत फलटण वीज महावितरणचे मुख्य अभियंता श्री. आवळेकर, जमाले, जाधव यांचेशी डिपी समस्येवर चर्चा करताना शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, नाना कोळेकर, धनाजी सरक, शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र घाडगे, अनिल सरक, सोमनाथ काळभोर आदी सर्व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर डिपीवर जास्तीचा वीज भार असल्यामुळे शिवसेना व शेतक-यांच्या मागणीनुसार 100 चा अतिरिक्त डिपी पुढील दीड महिन्यात तातडीने बसवुन देण्याचे फलटण वीज महावितरणचे मुख्य अभियंता श्री. आवळेकर व साखरवाडी विभागाचे अधिकारी जाधव यांनी ठोस आश्वासन दिले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
यावेळी सालपे येथील 63 चा बिरोबा डिपी तात्पुरत्या स्वरुपात तात्काळ बसवण्याबाबत व नविन 100 चा डिपी देणेबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच घाडगेमळा येथील सुनिल घाडगे डिपीवर धोकादायक झालेल्या ठिकाणी तात्काळ नवीन फ्यूज बसवणेबाबत साखरवाडी विभागाचे वीज महावितरणचे अधिकारी श्री. जाधव यांना महावितरणने आदेश दिले आहेत असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील नागरिकांना कोणतीही समस्या असल्यास फलटण शहरातील आयसीआयसीआय बँकेसमोरीर मोनिता गार्डनमधील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे संपर्क साधावा. आपणास निपक्षपातीपणे न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. फक्त समस्या योग्य हवी. शिवसेना फलटण तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी 12 महिने 24 तास नम्रपुर्वक कटीबद्ध आहे असे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.