सेलू येथील तक्षशिला प्रतिष्ठान यांच्या वतीने महान सम्राट प्रियदर्शी अशोक यांच्या २३२६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या ठिकाणी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जवळ असलेल्या अशोक विजयास्तंभाजवळ अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ऍड. हर्षवर्धन सोनकांबळे यांनी मार्गदर्शन केले. याठिकाणी कार्यक्रमासाठी अॅड. दिपक भुक्तर, अॅड. अक्षय प्रधान, रवि घनसावद, गोवर्धन गायकवाड, अमोल डंबाळे, शुकाचार्य शिंदे, संदेश जाधव, सुधीर धापसे, नागसेन दवंडे, राजू हातागळे, सिद्धार्थ भवाळे, किरण तळेकर इत्यादी हजर होते.