परळी आदीलाबाद पॅसेंजर रेल्वे मध्ये डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती.
किनवट प्रतिनिधी :- गजानन वानोळे
किनवट माणसातली माणुसकी जेव्हा जागृत होते. डॉक्टर प्रदीप शिंदे यांनी डॉक्टरातील दैवतं सिद्ध केलं.
परळी आदीलाबाद पॅसेंजर रेल्वे मध्ये डॉक्टरांनी केली महिलेची प्रसूती.
आज दि.27/4/2022 रोजी ईस्लापुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप शिंदे नांदेड वरून परळी आदीलाबाद पॅसेंजरने इस्लापूर
येथे ड्युटीला येत असताना त्यांना रेल्वे मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेला प्रसूतीच्या कळा येत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी
त्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनाही बाब लक्षात आणून दिली. व घरच्या कुटुंब यांना विश्वासात घेऊन त्या महिलेची प्रसुती रेल्वे डब्यातच करून महिला व बाळाला जीवदान दिले.
तेव्हा माणसातली माणुसकी डॉक्टरातील दैवत सिद्ध करण्याची जाणीव डॉक्टर प्रदीप शिंदे यांनी निश्चितच रेल्वेतील प्रवाशांना दिली .
किनवाट तालुक्यातील मौजे बोधडी येथील महिला नाजुका अनिल कवडेकर ती त्यांच्या कुटुंबीयांसोबत भोकर येथून बोधडी येथे गावी जाण्यासाठी येत असताना थेरबन येथील रेल्वे स्थानकावर अचानक तिला प्रसूतीच्या कळा व वेदना होण्यास सुरुवात झाली
ही बाब मानसेवी वैद्यकिय अधिकारी प्रदीप शिंदे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून या महिलेची प्रसुती रेल्वेचे डब्यातच केली.
पुढील तपासणीसाठी त्या महिला व बाळास हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय पाठवण्यात आले. याप्रसंगी प्रवासी महिलांनी सुद्धा त्यांना सहकार्य केले. डॉक्टरच्या या धाडसामुळे त्यांच्यावर चाहते वर्गाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.