Type Here to Get Search Results !

नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या चाळीसगाव पी आय केके पाटील यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे विश्व वारकरी सेना

नारदाच्या गादीचा अपमान करणाऱ्या चाळीसगाव पी आय केके पाटील यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे





जळगाव खान्देश तेथील चाळीसगाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असताना किर्तन रात्री दहाच्या समोर फक्त पाच ते दहा मिनिट वाढल्यामुळे चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पी आय के के पाटील हे कथा मंडपामध्ये जोडा सहा येऊन सरळ जोड्या सहित नारदाच्या आसनावर उभे राहिले व कीर्तनकार महाराजांना कीर्तन बंद करायला सांगितले व मंडपातील कीर्तनकार गायक-वादक महाराज मंडळींना दमदाटी चालू केली.

आणि हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विश्व वारकरी सेना संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी के के पाटील यांना फोन करून झालेल्या प्रकाराबद्दल माहिती विचारली असता त्यांनी मला वारकरी संप्रदायाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे हा प्रकार माझ्याकडून घडले असे सांगण्यात आले पण नारदाच्या गादिचा अपमान झाल्यामुळे आपण वारकरी संप्रदायाची जाहिरात माफी मागण्याचा एक व्हिडिओ प्रसारित करावा अशी विनंती केली असता के के पाटील यांनी माझी काही चूक नाही असे सांगून फोन बंद केला

 म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची विश्व वारकरी सेनेच्या वतीने नम्र विनंती आहे की लाऊड स्पीकर चा नियम सर्व धर्मा करता सारखा असावा जर हिंदू धर्मातील कथा कीर्तनामध्ये लाऊड स्पीकर करिता वेळेचे बंधन असेल तर तो नियम इतर धर्मियांना ही लागू पडायला पाहिजे आणि म्हणून चाळीसगाव येथील पोलिस स्टेशनचे केके पाटील यांचे त्वरित निलंबित करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रातील सबंध वारकरी पुरस्कार उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. श्री गणेश महाराज शेटे व विश्व वारकरी सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जळगाव खान्देश ह भ प संतोष महाराज वाघोडकर यांच्या वतीने देण्यात आलेला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad