Type Here to Get Search Results !

चंद्रपूर | पेसा क्षेत्रातील गावात तुतीयश्रेणी कर्मचारी आदीवासी युवक युवातीना संधी द्या - आबीद अली यांची मागणी

पेसा क्षेत्रातील गावात तुतीयश्रेणी कर्मचारी आदीवासी युवक युवातीना संधी द्या आबीद अली यांची मागणी  



चंद्रपूर प्रतिनिधि मनोज गोरे

     चन्द्रपुर जिल्हयातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील राजुरा कोरपना जिवती शेकडो गावे पेसा कायदया अतर्गत निश्चीत केले आहे व मामहीम राज्यपाल याच्या अधिनस्त मार्गदर्शन व निर्देशावर अमलबजावणी राबविल्या जाते मात्र या भागातील ९०पेक्षा अधिक ग्रामपंचायती .पेसा अतर्गत  जि, प शाळा  वनरक्षक तलाठी आरोग्य सेविका ग्रामसेवक ही पदे गावाच्या जनतेशी नळजोडणारी आहेत पेसा अतर्गत निधि शासन उपलब्ध करूण गावाच्या विकासाला दिशा व मुलभूत पायाभुत सुविधा गावाला उपलब्ध होत असले तरी सामाजिक व आर्थीक विकासासाठी ग्रामीण भागात स्थानिक अनुजमाती वर्गातील गोंड, कोलाम परधान समुहात बेरोजगार युवकाची सख्यां अधिक आहे या तालुक्यात सिमेंट कोळसा उघोग मोठया प्रमाणात असला तरी स्थानिक कामगार ऐवजी परप्रांतीय कामगाराना संधी दिल्या जाते आदीवासी युवकाना काम देण्यासाठी कंपनी पाठ फिरविते असे चित्र आहे यापूर्वी १९९०, ते९५ मध्ये  नक्षलप्रभावीत क्षेत्रात १२वी शिक्षीत आदीवासी युवकाना शिक्षक पदावर संधी दिली 


यामुळे अनेक युवकाना संधी मिळाली व शिक्षकसेवक नियुक्ती देऊन ५ वर्षात आवश्यक शैक्षणिक पात्रता मिळाल्यानतंर कायम करण्यात आले पेसा कायदा तरतुदी नुसार पेसा गावाना आदीवासी कर्मचारी हवेमात्र ९८ % आदीवासी कर्मचारी या पेसा क्षेत्रात नाही हि वस्तुस्थीत आदीवासी कर्मचारी अनुषेश असल्याने स्थानिक आदीवासी कोलाम समाजाला विकासाच्या प्रवाह मध्ये सहभागी करुण ग्रामीण व्यवस्थेला चालना देण्यासाठी १२ वी किवा पदविधर युवक युवतीना ग्रामसेवक शिक्षक तलाठी आरोग्य सेवक /सेविका वनरक्षक या पदावर निवड करुण पुढील ५ वर्षात आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त करण्याची संधी द्यावी व पेसा कायदयाची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आबीद अली चन्द्रभान तोडासे मानीक आडे विकास टेकाम भाऊराव किन्नाके यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन चर्चा केली 

यामध्ये पेसा क्षेत्रात आदीवासी समाजाचे कर्मचारी भरती करण्यात यावे तसेच  आदीवासी विकास विभागाच्या शासन निर्णय २२ मार्च २०२२ नुसार नंदुरबार धुळे जिल्हयाच्या धर्तीवर नक्षलग्रस्त पेसा  व वनक्षेत्रातील आदीवासी शेतकऱ्यासाठी ९५ % अनुदानावर शेडनेट पॉलीहाऊस साठवणुक गोडाऊन सिप्रीकंरसंच ठिबक सिंचन इत्यादी कृषी योजना चन्द्रपुर जिल्हयातील पेसा क्षेत्रात लागु करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली व याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे मत्र्यांनी आश्वासक उपस्थीताना केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News