Type Here to Get Search Results !

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून आचरणात आणावेत - खासदार हेमंत पाटील

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून आचरणात आणावेत - खासदार हेमंत पाटील

नांदेड /हिंगोली /यवतमाळ : समाजाच्या उद्धारासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून ते आचरणात आणण्याची गरज असून असे झाल्यास खर्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण होईल . असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले . हिंगोली , वसमत , औंढा नागनाथ, सेनगाव येथे आयोजित भीमजयंती सोहळयात उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन खासदार हेमंत पाटील यांनी अभिवादन केले .


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधत खासदार हेमंत पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, वसमत , औंढा नागनाथ आणि सेनगाव येथे भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ते बोलत होते . खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वच विषयातील अथांग ज्ञान होते. त्या ज्ञानाचा उपयोग दीनदुबळ्या शोषित पीडित समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी केला आणि भारतीय घटनेची निर्मिती करून देशाला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेबांनी केले . समाजातील शोषित , पीडित, दिन दुबळा, कामगार ,स्त्रिया , यांना त्यांच्या हक्काची जाणीव डॉ. बाबासाहेबांनी करून दिली असल्यामुळे हा भारतीय समाज अनंत काळासाठी ऋणात राहिलं यात दुमत नाही . दरवर्षी मोठ्या उत्साहात महामानवाचा जयंती उत्सव साजरा करण्यात येतो पण मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्यामुळे सर्वच धार्मिक, सार्वजनिक , कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते . परंतु यंदा हे सर्व निर्बध हटवले असल्यामुळे मोठ्या उत्साहात भीमजयंती साजरी करण्यात येणार आहे सर्वाना भीमजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. 

यावेळी वसमत चे नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, तालुकाप्रमुख राजु चापके, अजय देशमुख सरसमकर #डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कमिटीचे अध्यक्ष यशवंत उबारे,मार्केट कमिटी सभापती तानाजीराव बेंडे, काँग्रेस प्रदेश सचिव अब्दुल हाफिज, डॉक्टर असोशियन चे अध्यक्ष डॉ. क्यातमवार साहेब, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजाराम खराटे, किसान सेना तालुका प्रमुख मच्छिंद्रनाथ सोळंके, युवासेना उपजिल्हाप्रमुख ईश्वर तांबोळी, तालुकाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, नगराध्यक्ष कपिल खंदारे, अजय देशमुख सरसमकर , डॉ सोमेश्वर पतंगे, शहरप्रमुख अनिल देव, नगरसेवक अनिलभाई देशमुख, प्रदीप गंभीरे, नगरसेवक राहुल दंतवार, गणेश पाटील, प्रदीप कनकुटे, विष्णू पवार, पत्रकार बाळासाहेब साळवे, गजानन वाखरकर, गजानन नाईक विलास काचगुंडे,नवनाथ मुळे, सहसंपर्कप्रमुख डॉ रमेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, तालुकाप्रमुख संतोष देवकर, शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, नगराध्यक्ष जगदिश देशमुख, युवासेना जिल्हा समन्वयक प्रवीण महाजन,सोंडु पाटील, नगरसेवक निखिल देशमुख, वैभव देशमुख, संदीप कोकाटे, शिलानंद वाकळे, सुदाम मुंडे, व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख गजानन उदावंत, कैलास खाडे, राहुल वाकळे, शेकुराव गडदे, भारत गडदे, भिमा गायकवाड, सुनिल शिंदे, भैय्या जाधव, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad