बागलवाडीच्या सिद्धनाथ सोसायटी मध्ये राष्ट्रवादीला भोपळा शेकाप व सेना युतीने 13/00 ने दणदणीत विजय मिळवला
प्रतिनिधी; बागलवाडी
दिनांक -21/4/2022 रोजी पार पडलेल्या पंचवार्षिक सोसायटी निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष तसेच शिवसेनेच्या युतीतून तयार झालेल्या शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा भरभक्कम अश्या मतांनी पराभव करत 13/00 ने दणदणीत विजय मिळवला. व बागलवाडीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व उमेदवारांनी भरघोस मताने निवडून येण्याच्या विक्रम केला.
शेतकरी विकास आघाडीचे नूतन सदस्य पुढीप्रमाणे; श्री.गजानन सोपान माने,श्री.आत्माराम गोपीनाथ चव्हाण,श्रीमती.संपता जालिंदर बागल,श्रीमती.वंदना सतपाल आळसुंदकर,श्री.दिनकर मोहन माने,श्री.दीपक तुकाराम आमले,श्री.भाऊसो बागल,श्री.रामचंद्र हरीबा वाघमोडे,श्रीमती.वैशाली ब्रह्मदेव चळेकर,श्री.आप्पा लक्ष्मण राजगे,श्रीमती. गयाबाई आबा खांडेकर, श्री.महादेव बंडू साठे,श्री.राहुल रामचंद्र वाळके इत्यादी. उमेदवारांच भरघोस मतांनी निवडून आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...
या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला मात्र आपली एकही जागा निवडून आणता आली नाही..
या विजयाच्या यशानंतर उमेदवारांनी आपले मत मांडले यावेळी ते म्हणाले जातीपातीचे राजकारण,नेहमीची खोटी आश्वासने, दमदाटीचे राजकारण, फसवाफसवी याच्या विरोधात झालेली ही निवडणूक आहे.यामुळे सर्व ग्रामस्थांचे एकमत होवून शेतकरी विकास आघाडीला कौल दिला.तसेच त्यांनी सर्व गावकऱ्यांचे आभार ही मानले ....
ठिकाणी समस्त ग्रामस्थ उपस्थित होते...