Type Here to Get Search Results !

सिंदेवाही पंचायत समितीचे ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते यांचा अपघाती निधन

सिंदेवाही पंचायत समितीचे ग्रामसेवक रामकृष्ण इरपाते यांचा अपघाती निधन


चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक या पदावर कार्यरत असलेले रामकृष्ण इरपाते वय ४० वर्ष यांचे आज सिंदेवाही -पात्री मार्गावर आय टी आय जवळ सायंकाळ च्या 5 : 30 वाजताच्या सुमारास अपघात होऊन जाग्यावरच निधन झाले.


मृतक पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सरडपार , व गुंजेवाही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. गुंजेवाही मधील ग्रामपंचायत मधील कामकाज आटोपून सिंदेवाही पंचायत समिती कडे दुचाकी ने येत असतांना सिंदेवाही पाथरी मार्गावर आय टी आय जवळ समोरून येणाऱ्या टाटा एस धडक बसल्याने रामकृष्ण इरपाते यांना डोक्याला जबर मार लागल्याने जाग्यावरच त्यांचे निधन झाले.

पोलीसांनी दोन्ही वाहनांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad