जागतिक रंगमंच दिन उत्साहात साजरा,सहयोग फाउंडेशन(IGPPANH) तर्फे जागतिक रंगमंच दिन केला उत्साहात साजरा..
२७/३/२२- जागतिक रंगमंच दिनाचे औचित्य साधून सहयोग फाउंडेशन तर्फे आरे पिकनिक पॉईंट येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित कार्यक्रमात कला सादरीकरण, गीत गायन, नाट्य प्रदर्शन, लाटी व दानपट्टा चालवण्याचे कार्यक्रम, निसर्ग संवाद, पर्यावरण पूरक गोष्टी अंगीकारण्यात बाबतचे मार्गदर्शन या व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संबंधित कार्यक्रमात विशाल पांचाळ यांनी गीत गायन केले. महानंदा तुपे यांनी निसर्ग संवाद साधून निसर्गावरील कविता सादर केली. नलिनी नामजोशी यांनी निसर्गावरील कविता सादर करून एक नाटिका सादर केली. सुनयना कानडे यांनी पर्यावरण पूरक वस्तूंचे प्रदर्शन भरविले होते. तसेच पर्यावरण पूरक वस्तुं बाबतचे महत्त्वही पटवून दिले. कार्यक्रमात आलेल्या निसर्ग प्रेमींनी निसर्गाबद्दल चित्र रेखाटून कलाविष्कार सादर केला. जतीन शहा यांनी बीज संकलन याविषयीची माहिती सर्वांना समजावून दिली. निशा काकडे यांनी योग विषयक माहिती सर्वांना पटवून दिली.लाटी करतब तसेच दानपट्टा चालवण्याचा कार्यक्रम विशेष ठरला. संबंधित कार्यक्रमास पर्यावरण प्रेमी समाज प्रेमींनी भरघोस प्रतिसाद दिला.
दरम्यान, संबंधित कार्यक्रमाची संपूर्ण धुरा मुकेश जाधव सांभाळलेली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल सिंगासने यांनी केले. संबंधित कार्यक्रमात निसर्ग संवाद आणि विविध रंगी कार्यक्रम हे कार्यक्रमाचे मुळ केंद्र होते.