Type Here to Get Search Results !

कोरपना | नारंडा येथे हायमास्ट लाईट टॉवरचे भूमिपूजन सरपंच सौ. अनुताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले.

नारंडा येथे हायमास्ट लाईट टॉवरचे भूमिपूजन सरपंच सौ. अनुताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले.


चंद्रपूर/कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथे दालमिया सिमेंट कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत हायमास्ट लाईट टॉवरचे भूमिपूजन सामाजिक सभागृह व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. अनुताई ताजने यांच्या हस्ते करण्यात आले.




या करिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी कंपनीकडे यासंदर्भात मागणी केली होती सदर मागणीच्या अनुषंगाने हायमास्ट लाईट टॉवर मंजूर करण्यात आले.

नारंडा येथे सामाजिक सभागृह व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात लाईटची व्यवस्था नसल्यामुळे अंधार पडत होता तसेच कार्यक्रमाच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे सदर बाबींची दखल घेत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत हायमास्ट लाईट टॉवरची मागणी केली व सदर मागणी मंजूर करण्यात आली.सदर मागणी मंजूर झाल्यामुळे दोन्ही परिसरात लाईटची व्यवस्था होणार आहे.

यावेळी सामाजिक सभागृह व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात भूमिपूजन करण्यात आले.यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,सरपंच अनुताई ताजने,उपसरपंच बाळा पावडे,पोलीस पाटील नरेश परसुटकर,ग्रामपंचायत सदस्य बाबुराव सिडाम,रुपाली उरकुडे,रंजना शेंडे,उपासे,सुरेश पाटील परसुटकर,नागोबा पाटील उरकुडे,कवडू उरकुडे,अनिल मालेकर,सत्यवान चामाटे,गौरव वांढरे,प्रवीण हेपट,मारोती शेंडे,मारोती बोबडे,अरुण सोनपितरे,योगीराज बोढे उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad