उमरखेड तहसिल कार्यालयाच्या वतीने जागतीक ग्राहक दिन उत्साहात साजरा
उमरखेड:-दि १५ आज दिनांक १५ मार्च २०२२ रोजी तहसिल कार्यालयाच्या वतीने उमरखेड येथे जागतीक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.विलासराव देवसर कर हे होते तर प्रमुरव पाहुणे म्हणुन ग्रा पंचायतचे सची व यशवंत गीरी, नायब तहसीलदार काशीनाथ डांगे, प्रा प्रकाश देशमुख, माजी ग वि अ सुभाष पांडे, किशोर महामुने, माजी तलाठी सोयाम ईं मान्यवर उपस्थीत होते
कार्यक्रमात ग्राहक दिनाचे महत्व ॲड. विलासराव देवसर कर यांनी समजावून सांगीतले., तसेच ग्राहकामध्ये जनजागृति व्हावी हा मुख्य उद्देश्य ठेऊन साध्य करण्यात आला. ग्राहकाची फसवणूक होऊ नये, फसव्या जाहिराती कशा येतात. याकडे ग्राहकांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. ग्राहकामध्ये जागरूकता असावयास पाहिजे. ग्राहकाची फसवणुक होऊ नये. आणि अचानक फसणुक झाली असल्यास असे लक्षात आले.
तर पुढे मुलभूत कलमात तक्रार करावी असेही कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ॲड विलासराव देवसरकर बोलत होते तर १९८६ च्या ग्राहक संरक्षण अधिनियम कायद्यामध्ये तक्रार दाखल करु शकतात . असे माजी ग विअ सुभाष पांडे म्हणाले तर जिल्हा ग्राहकमंच, राज्य ग्राहक आयोग, राष्ट्रीय ग्राहक आयोग असते. या तीन हि ठिकाणी आपले दावे दाखल करता येतात. असे प्रा प्रकाश देशमुख यांनी सांगीतले तसेच, विशिष्ट मर्यादेमध्ये असतील ते जिल्हा ग्राहकमंचा कडे जाता येते त्या पेक्षा जास्त राज्य ग्राहक आयोग कडे जाता येते. व त्याहि पेक्षा जास्त राष्ट्रीय आयोग कडे जाता येते .
अशा प्रकारे हि त्रिसूत्री योजना या कायद्यामध्ये टाकलेली आहे. ग्राहक जागृत झाला पाहिजे. त्यासाठी हा आज चा दिवस आपण पाळत आहो. कार्यक्रमाचे प्रास्तावीक सचिव यशवंत गीरी यांनी केले त्यामध्ये त्यांनी ग्राहक पंचायतची आजपर्यतचे कार्य विषद करून अनेक तक्रारीची सोडवणूक केल्याचे सांगीतले, या कार्यक्रमात नायब तहसीलदार काशीनाथ डांगे, पुरवठा अधिकारी संदानंद थोरवे, माजी ग वि अ सुभाष पांडे , प्रा प्रकाश देशमुख, ,एस डी गुटे, एम एस तिडके, श्री सोयाम, श्री महामुने, यशवंत गिरी आणि तसेच ग्राहक पंचायतचे सर्व पदाधीकारी , सदस्य व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन संदीप घाडगे यांनी तर आभार एम एस तिडके यांनी मानले