होळी उत्सव शांततेत साजरा करा,अन्यथा कारवाई करु : ठाणेदार बिटरगाव प्रताप भोस यांचा इशारा,
प्रतिनिधी निगंनुर मैनोदिन सौदागर
दिनांक 17.03.2022 रोजी होळी आणि दिनांक 18.03.2022 रोजी रंगपंचमी सर्वत्र साजरी होणार आहे . कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन होळी सण साजरा करा. होळी दरम्यान ठिकठिकाणी लोक उत्साहात एकमेकांवर रंग उधळतात . सार्वजनिक होळी पेटविण्याचे ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. शांततेत होळी उत्सव साजरा करा कायदा व सुव्यवस्था अबाधित करणार्यांवर गंभीर कारवाई करू असा इशारा बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस . यांनी सांगितले.
होळी पेटवितांना काळजी घेऊन होळी पेटवा, चराऊ रानमाळ असलेल्या भागात होळी पेटवितांना योग्य ती खबरदारी घ्यावी, होळी दरम्यान मदयपान करुन वाहन चालविणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे . होळी साजरी करण्यासाठी जबरदस्तीने वर्गणी करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात येईल,
होळी आणि रंगपंचमी साजरी करतांना कोणीही डी जे वाजवु नये तसेच रात्री 10 च्या आतच होळी उत्सव साजरा करावा . उत्सव साजरा करतांना होणाऱ्या गर्दीत महीलांनी दागिन्यांची . आभुषणांची काळजी घ्यावी . उत्सव दरम्यान महिलांच्या अंगावर रंग . पाणी फेकणे , छेडछाड / विनयभंग करणे , रंगाचे / पाण्याचे फुगे मारणे , विहित मर्यादेपेक्षा अति उच्च आवाजात ध्वनी क्षेपकांचा वापर करणे , रंग उधळणे , जातीवाचक घोषणा देणे , होळीसाठी लाकडे चोरुन नेणे इत्यादी प्रकार निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
होळी आणि रंगपंचमी उत्सव साजरा करतांना सर्व नागरीकांनी कोविड 19 संदर्भातील शासनाचे निर्देशांचे पुर्णपणे पालन करावे , गर्दी करु नये तसेच मास्क व सॅनीटाझर चा वापर करावा .
सध्या इयत्ता 10 आणि 12 वी च्या परीक्षा चालु असल्याने विदयार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय होणार नाही या करीता लाउड स्पिकर लावु नये . होळी , रंगपंचमी उत्सव शांततेत साजरा व्हावा या करीता होळी , रंगपंचमी दरम्यान . होळी , रंगपंचमी बंदोबस्त करीता पोलीस स्टेशन बिटरगाव च्या.वतीने पुरविण्यात येत आहे . सर्वांनी शांततेत होळी साजरी करावी असे आवाहन पोलीस स्टेशन बिटरगावचे ठाणेदार प्रताप भोस यांच्या वतीने करण्यात येत आहे.तसेच समस्त जनतेला होळी सणाच्या पोलीस स्टेशन बिटरगावच्या वतीने हार्दिक. शुभेच्छा दिल्या.