डोंगराळ भागातील शंकरवाडी येथे पाझर तलाव विशेष दुरुस्तीचे भुमिपूजन
प्रतिनिधी निंगनूर : मैनोदिन सौदागर
अतिदुर्गम व डोंगराळ भागातील सिंचनक्षेत्र वाढीसाठी लघुसिंचन उपविभागामार्फत दुष्काळग्रस्त शंकरवाडी येथील तलावाच्या विशेष दुरुस्ती कामाचे भुमिपुजन करण्यात आले .
शंकरवाडी पाझर तलावाच्या पिचींग व भिंतीवर मुरुम भरणे , या कामासाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत 13 लक्ष 52 हजार 876 रुपये नीधी उपलब्ध करण्यात आला असून जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे यांच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे पुसद लघुसिंचन उपविभागाच्या उपअभियंता सीमा तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जि . प . सदस्य पंकज मुडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेश बरडे प्रमुख पाहुणे सौ. प्रेमाताई भुसाळे आणि. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पंकज मुडे , कनिष्ठ अभियंता आशिष पांडे, निंगनूरचे उपसरपंच महेमुनिसाबेग वलिउल्हाखाँन , नामदेव मुरमुरे . पुंजाराम मेंडके , गोपीनाथ टारफे , संभाजी मुरमुरे , गजानन मुरमुरे, लक्ष्मण मुरमुरे, जनार्दन तरटे, एजास अली नवाब , चांदुराम दुबळकर, उकंडा मुरमुरे , कंत्राटदार मनोज माळोदे रोशन पवार. रमेश बडगे.आदिंची यावेळी उपस्थिती होते .