सागवानी जिवंत झाडाची कतल ..? आणी तस्करी मालजप्त...?
नांदेड प्रतिनीधी :- प्रमोद जाधव
ईस्लापूर येथे अवैधरित्या सागवान जिवंत झाडांची तोड केलेले एकतीस नग त्याची किंमत पाच हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल ईस्लापुर वन विभागाने जप्त करून कारवाई केल्याची घटना दिनांक ११ मार्च रोजी रिठा तांडा येथे घडली..
रिठा तांडा येथे राखीव जंगलात जिवंत सागवान झाडांची अवैध तोड केल्याची गुप्त माहिती ईस्लापूर वन विभागातल्या वनपाल, देशमुख, याना मिळताचं त्यानी आपली वन .फोज घेऊन तस्कराच्या मुसक्या आवळण्यासाठी गेले असता रिठा तांडा येथील कृष्णा राठोड, यांच्या घरा समोरील सागीजाळे ०९,घन.मीटर ०, २२२. त्याची किंमत ४,७०० रूपये व सागी बल्ल्या (वासे)नग २२ त्याची किंमत १,१०० रुपये असे एकूण ५,८००, रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदरील माल ईस्लापूर वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करून ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, ए. आर. देशमुख, यानी केली . त्यावेळी..? वनरक्षक वैशाली हनुमंत मुसळे,एस व्ही माहुरे, नाजुका पारधी, वनरक्षक नंदकुमार, यमलवाड, चालक डी. बी. दुरपडे, वनमजूर मारुती भालेराव, प्रेम आडे, हे उपस्थित होते. धाडसी कार्यवाही मुळे तस्कराचे धाबे दणाणले...?