Type Here to Get Search Results !

रेती तस्कर सैराट ! मंडळ अधिकाऱ्यांनाच जिवे मारण्याची धमकी

रेती तस्कर सैराट ! मंडळ अधिकाऱ्यांनाच जिवे मारण्याची धमकी



अधिकाऱ्यांचा मोबाईल हीसकावून डिलीट केले फोटो - पोलीस तक्रार दाखल

गंगापूर प्रतिनिधी मनोज गोरे
चंद्रपूर जिल्ह्यात निसर्गाने अनेक नैसर्गिक संपदा मुक्त हस्ते बहाल केल्या असुन वन संपदेसह जिल्ह्यात खनिज संपदा देखिल विपुल प्रमाणात असल्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, सिमेंट कारखाने, विद्युत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असुन ह्यातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे.
निसर्गाने बहाल केलेल्या ह्या संपदेचे संवर्धन करणे काळाची गरज असुन सर्व नागरिक तसेच शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ह्या संपदेचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ह्या नैसर्गिक संपदेचे दोहन करण्याचे प्रकार सर्रास सुरू असून अधिकाऱ्यांच्या अर्थपुर्ण आशीर्वादामुळे खनिज व इतर संपदेचे अवैध उत्खनन करणाऱ्यांची हिंमत वाढली असुन हे तस्कर आता अक्षरशः सैराट झाल्याचे दिसत आहे.


आपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या आड येणाऱ्यांचा मुडदा पडायला देखील हे तस्कर मागेपुढे पाहणार नाही अशीच परिस्थिती आज चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे उघडकीस आली असून अवैध रेती तस्करांनी चक्क मंडळ अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असुन महसूल व पोलीस विभागाचा अवैध धंदे करणाऱ्यांवर वचक नसल्याचे सिद्ध झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार काेरपना भागात नदी -नाल्यातुन रेती चाेरीचे प्रमाण वाढले असुन चाैकशीसाठी गेलेल्या मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व पथकास जिवे रेती तस्करांनी जिवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार कोरपना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

आज सकाळच्या वेळी काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे व त्यांचे पथकातील पटवारी विरेन्द्र मडावी, विशाल काेसनकर, प्रकाश कामालवार, काेतवाल रुपेश पानघाटे, तसेच हरिश्चंद्र अहिरकर यांनी काेरपना भागातील अवैध गाैण खनिज प्रकरणावर अंकुश व दंडात्मक कारवाया करण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशानुसार गेल्या काही महिण्यांपासून यशस्वी माेहीम राबविली आहे .एवढेच नाही तर त्यांनी माेठ्या प्रमाणात कारवायां देखिल केल्या आहे ही बाब तेवढीच सत्य आहे. या सततच्या (महसुल विभागाच्या) कारवायांमुळे काेरपना भागातील रेती तस्करांचे अक्षरशा धाबे दणाणले आहे. अशातच एका अवैध रेती चाेरी प्रकरणात उपरोक्त पथक चाैकशीसाठी घटनास्थळी पाेहचले असता त्यांना रेती तस्करांकडुन अर्वाच्य भाषेत बाेलून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.१० मार्चला दुपारी पिपरी झाेटींग परिसरात घडली .या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार कळते की काल गुरुवार ला मंडळ अधिकारी पचारे यांना कोरपना येथे जात असताना गुप्त माहितीच्या आधारे त्यांना रेती भरलेले ट्रॅक्टर जात असल्याची माहिती मिळाली माहिती नुसार त्यांनी पिपरी झोटींग शिवार गाठले.

त्या नाल्यात रेती नेण्यासाठी ट्रॅक्टर उभे असल्याचे त्यांना दिसून आले, नंतर मंडळ अधिकारी पचारे व कोतवाल रुपेश पानघाटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. काही वेळातच त्यांनी घटनास्थळावरील माहिती तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांना भ्रमनध्वनी वरुन दिली. तहसीलदार यांनी क्षणाचा विलंब न करता त्यांनी कोरपनाचे तलाठी प्रकाश कामालवर व वीरेंद्र मडावी यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले त्याच वेळी तलाठी,विशाल कोसनकार व काेतवाल हरिश्चंद्र अहिरकर हे सुद्धा त्या ठिकाणी आले .
रेतीने भरलेले व नाल्यात फसलेले टैक्टर राहुल नवले यांच्या वाहनाने काढण्याचे प्रयत्न घटनास्थळी सुरु हाेते .नाल्यात फसलेले टैक्टर निघाले परंतु त्या वाहनास काढणारी गाडी परत पलटली .हे दाेन्ही वाहने सरळ करून ते रेती तस्कर व त्यांचे साेबती घटनास्थळावरुन वाहनासह पळाले .काही वेळाने दिलीप मुद्दलवार , त्याचा लहान भाऊ, राहुल नवले व इतर काही त्याचे सहकारी घटनास्थळी पाेहचले त्यांनी पचारे यांचे खासगी वाहनात बसुन असणा-या वीरेंद्र मडावी व चालक यांना धमकविण्याचा प्रयत्न सुध्दा केला इतकेच नाही याच गाडीवर शारीरिक बाळाचा वापर करुन चक्के दंडे ठाेकले त्यांना गाडीतून बाहेर निघा अशी अरेरावी देखिल केली या शिवाय त्यांचे मोबाईल हिसकाविले व या पथकाने माेबाईलने कैमे-यात काढलेले छायाचित्रे जबरदस्तीने मिटविले व सर्व पुरावे नष्ट केले.एवढ्यावरचं हे रेती तस्कर थांबले नाही तर त्यांनी या पथकास जीवे मारण्याची व पाेलिस कारवाई न करण्याची धमकी देखिल दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad