Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या दणक्याने महावितरणकडुन तात्काळ वीजपुरवठा सुरळीत

शिवसेनेच्या दणक्याने वीज महावितरणकडुन तात्काळ वीजपुरवठा सुरळीत : प्रदिप झणझणे, शिवसेना फलटण तालुका प्रमुख



महाराष्ट्र शासनाच्या उर्जा विभागाने राज्यातील शेतक-यांना एकुण थकीत वीजबीले भरण्यासाठी 50% सवलत दिलेली आहे व त्याची मुदत मर्यादा 31 मार्च 2022 आहे. तरीदेखील फलटण तालुक्यातील वीज महावितरणचे वरिष्ठ अधिकारी खिलारे हे कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना वीजबील वसुलीचे टार्गेट देऊन त्यांना थेट शेतक-यांच्या कृषीपंपावरील डिपीचा विद्युतपुरवठा बंद करण्यासाठी सांगत असल्याचे एका कनिष्ठ अधिका-याने स्पष्ट सांगितल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.


खिलारे यांच्या आडमुठ्या व शेतकरी हिताविरोधीच्या धोरणामुळे खिलारे हे महाराष्ट्र शासनाचा व देशाच्या संविधानाचा अवमान करुन, स्वतः कायद्याची पायमल्ली करुन कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनाही कायदा चुकीच्या पद्धतीने हातात घेण्यास सांगत आहेत. थेट डिपी बंद केल्याने चालू वीजबील भरलेल्या शेतक-यांनाही नाहक या आडमुठेपणाचा तीव्र फटका बसत असुन शेतपीकांचे अतोनात नुकसान होत आहे. अशी परिस्थिती संपुर्ण फलटण तालुक्यात असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
फलटण वीज महावितरणचे वरिष्ठ अधिकारी खिलारे यांचे आदेशावरुन कोणतीही लेखी नोटीस न देता थेट डिपीचा विद्युतपुरवठा बंद झाल्यामुळे तडवळे, घाडगेमळा, खराडेवाडी येथील शेतक-यांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालय फलटण येथे आपली तक्रार दिल्यानंतर शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी शेतक-यांसह फलटण वीज महावितरणला सदर डिपींचा विद्युतपुरवठा तात्काळ सुरु करावा व कायदा हातात घेणारांवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठीचे निवेदन दिले आहे. निवेदन दिल्यानंतर काही तासातच तात्काळ वीज महावितरणने शिवसेनेच्या निवेदनाची गंभीर दखल घेत तेथील सर्व डिपी चालु केले असल्याचे शेतक-यांनी मोबाईलद्वारे कळवल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
फलटण वीज महावितरणचे वरिष्ठ अधिकारी खिलारे यांचे तात्काळ निलंबन करण्याची शेतक-यांची मागणी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सातारा जिल्हा वीज महावितरणचे मुख्य अभियंता गायकवाड यांचेकडे केली आहे. तसेच फलटण तालुका वीज महावितरणचे मुख्य अभियंता मकरंद आवळेकर यांचेही कानावर सदर विषय घातलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News