Type Here to Get Search Results !

सांगोला | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकर मंगेवाडी आदर्श पुरस्काराने सन्मानित.

जि. प.प्राथमिक शाळा ह.मंगेवाडी आदर्श पुरस्काराने सन्मानित!




ह.मंगेवाडी प्रतिनिधी: आबासाहेब शेवाळे
सांगोला तालुक्यातील ह. मंगेवाडी गावात इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत असलेली जि. प. प्राथमिक शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित. या शाळेतील मुख्याध्यापक कुमार बनसोडे सर व त्यांचे इतर सहकारी शिक्षक वर्ग यांच्या सहकार्याने गावात एकमेव शाळा असल्याने शाळेत सर्व सुविधा व सुशोभीकरण ,विविध प्रकारची झाडे ,फुलझाडे ,शाळेस रंगरंगोटी, अशा विविध प्रकारे शाळेचे देखणे रूप समोर येत आहे . यामुळे शाळेचेच नाही तर गावाच देखील नाव लवकिक झालेल आहे.

हटकर मंगेवाडी गाव चारी बाजूंनी डोंगराळ परिसराने वेढलेलं असूनदेखील या शाळेत जवळ जवळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून पायी चालत नित्यनेमाने विद्यार्थी शाळेत येत असतात. या गावांमध्ये चार वाड्या-वस्त्या गावठाण असा परिसर असला तरीदेखील या गावातील विद्यार्थी आपल्या गावात असणाऱ्या प्राथमिक शाळेला प्राधान्य देत असतात.


या शाळेत अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण व वैयक्तिक विद्यार्थ्यांवर लक्ष दिले जाते. या शाळेत सर्व उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, मनोरंजन , थोर नेत्यांच्या व महापुरुषांच्या जयंती राबवल्या जातात . क्रीडा क्षेत्रामध्ये तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पर्यंत या शाळेतील खेळाडूंनी मजल मारलेली आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक कुमार बनसोडे सर यांच्याकडून वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News