Type Here to Get Search Results !

चंद्रपूर | रामनगर पोलिसांनी १ कोटी च्या दारुवरती चालवला बुलडोजर | दारूबंदीत जप्त केलेली दारू केली नष्ट

रामनगर पोलिसांनी १ कोटी च्या दारुवरती चालवला बुलडोजर दारूबंदीत जप्त केलेली दारू केली नष्ट





चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
चंद्रपूर :- दारूबंदीचा काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री सूरू होती. गावागावात अवैध दारू विक्रेत्यानी पाय पसरले होते. पोलीस विभागांच्या कार्यवाहींना न जुमानता अवैध दारूविक्रीला जिल्ह्यात उधान आले होते. जिल्ह्यात दारूबंदीचा काळात मोठ्या प्रमाणात अवैध दारू पोलीसांनी जप्त केली.




दारूबंदी उठली मात्र दारूबंदीत जप्त केलेली दारू तशीच पडून होती. चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस ठाण्या अंतर्गत 220 गुन्हातील 99 लक्ष 20 हजार नवशे रूपयांचा दारूसाठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा देखरेखीत रामनगर पोलीस ठाणे द्वारे बुलडोजर चालविण्यात आला. (Liguor Distoy)




सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक, (SP) अप्पर पोलीस अधीक्षक, (Add.SP) उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनात तर रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे (P.I. Ramnagar) यांच्या नेतृत्वाखाली गजानन डोईफोडे व इतर रामनगर पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरच्या पथकाने संयुक्तपणे केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad