निगंनूर येथे दोन दिवसीय एसएमसी प्रशिक्षण चे आयोजन
उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या निंगणुर केंद्रामध्ये दोन दिवसीय एसएमसी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रशिक्षणामध्ये शाळा व्यवस्थापन समिती त्याची जबाबदारी त्यांचे कार्य निपून भारत व आपत्ती व्यवस्थापन याबद्दल प्रशिक्षक सांगळे सर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पिंपळवाडी व मुंजाळ सर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा निंगणुर यांनी या प्रशिक्षण शिबिरामध्ये मार्गदर्शन केले
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन निगणुर येथील सरपंच सुरेश बर्डे उपसरपंच व निगनुर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निंगणुर चे मुख्याध्यापक चौधरीसर निंगणूर येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देविदास खंदारे पत्रकार मैनोदीन सौदागर मारुती गव्हाळे गजानन नावडे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मराठी निंगणुर मध्ये येणाऱ्या सर्व शाळेचे शिक्षक वृंद 50% शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सदस्य या शिबिरामध्ये उपस्थित दर्शविली होती