चिंचवाडी निंगनुर रस्ता सुरु न केल्यास गुराढोरासह उपोषणास बसणार - मारोती गव्हाळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ
उमरखेड तालुका अंतर्गत येत असलेली चिंचवाडी ही वस्ती असून, ती वस्ती ही संपूर्णतःहा आदिवासी वस्ती आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे येजा करण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही. तेथील जनता त्या रस्त्याअभावी भयानक त्रस्त आहे. रस्ता नसल्याने तिथे कुठलाच शासनाचा अधिकारी किंवा पदाधिकारी फिरकत नाही. फक्त निवडणुकीपूरती पोकळ आस्वासने देऊन मतदान घेऊन निघून जातात. परंतु त्या नंतर त्या वस्तीला टोकूनही पाहत नाहीत. खरच तिथे कुठल्याही प्रकारची रस्ता नाही. त्या रस्त्याअभावी शिक्षणावर व आरोग्यावर फारच विपरीत परिणाम होत असताना दिसत आहे. तेथील युवापिढी व्यसनाधीनतेच्या मागे लागत आहे.
तो रस्ता आमदार साहेब यांच्या स्थानिक निधीमधून मंजूर झाला आहे, असे बोलल्या जाते. परंतु कोणत्या का होईना? तो रस्ता हा पूर्णत्वास न्यावा. त्यामध्ये संबधीत विभागाणे जातीने लक्ष देऊन, व खास करून विधानसभेचे लाडके आमदार यांनी जातीने लक्ष देऊन तो रस्ता चालू करावा. अशी मागणी ग्रामस्थांमार्फत होत आहे.तो रस्ता २० तारखेपर्यंत चालू न झाल्यास पूर्वसूचना देऊन चिंचवाडी येथील सर्वत्र महिला व पुरुष गुराढोरासह उपोषणास बसणार असे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ युवा जिल्हाध्यक्ष तथा बिरसा क्रांती दल जिल्हाउपाध्यक्ष यवतमाळ मारोती गव्हाळे यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले