स्वच्छतेच्या अभावामुळे मुरबाड तहसीलदार कार्यालयात सर्वत्र दुर्गंधी ! मास्क नाही तर प्रवेश नाही.
मुरबाड प्रतिनिधी लक्ष्मण पवार
तालुक्यातील प्रशासनाचा केंद्रबिंदू असलेल्या तहसीलदार कार्यालयात स्वच्छतेच्या अभावामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने कोरोनाचे प्रमाण कमी असतानाही कार्यालयात प्रवेश करताना मास्क नाही तर प्रवेश नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..
कोरोनाचे पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी विविध प्रकारची काळजी घेतली जात असताना तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाचे केंद्रबिंदू असलेल्या तहसीलदार कार्यालयात दररोज हजारो नागरिक आपली विविध कामे करण्यासाठी येत असताना या कार्यालयात तसेच परिसरात स्वच्छता राखली जात नसुन स्वच्छता गृहात देखील पुरेसे पाणी नसल्याने लघुशंका केल्यानंतर किमान हात धुण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे या स्वच्छता गृहा शेजारी असलेल्या सहायक निबंधक कार्यालयात जमिनीचे खरेदी विक्री व्यवहारासाठी येणाऱ्या नागरिकांना व पोलिस कस्टडी या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी ला सामोरे जावे लागत असल्याने मुरबाड तालुक्यात सध्या कोरोनाचे प्रमाण कमी असल्याने नागरिक मास्क वापरणे टाळतात ,मात्र तहसीलदार कार्यालयात प्रवेश करायचा असेल तर मात्र नागरिकांना मास्क लावल्याशिवाय प्रवेश करता येत नाही.संपुर्ण ठाणे जिल्ह्यात सुसज्ज आणि एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन झालेले असताना या कार्यालयात किती स्वच्छता राखली जाते याचे दर्शन प्रवेश करताना नागरिकांचे निदर्शनास येते.प्रशासनाचे या उदासिनतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असुन सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.
या कार्यालयाचे स्वच्छता गृहाची दररोज स्वच्छता केली जाते. आज केलेली नसल्याने दुर्गंधी पसरली असावी.- प्रसाद पाटील.नायब तहसीलदार मुरबाड.