Type Here to Get Search Results !

सारंगापूर वासीय या ही उन्हाळयात राहणार तहानलेले

सारंगापूर वासीय या ही उन्हाळयात राहणार तहानलेले



चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे


जिवती :- जिवती नगर पंचायत मधील आधी गट ग्रामपंचायत असलेले आणि आता नगर पंचायत जिवती चा प्रभाग असलेले सारंगापूर हे गाव. नेहमीच पाण्यासाठी वणवण.गावाला कधीच आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष पुष्पा नैताम आणि त्यांच्या सहकारी पदाधिकारी यांनी 23 लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना सारंगापूर गावासाठी मंजूर केली. 

वनविभागाची परवानगी मिळविण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवून वन विभागाचे ना हरकत मिळवून बांधकामाची निविदा काढली. पण निविदा मंजूर झाली एका असंवेदनशील कंत्राटदाराला. ओम साई असोशिएट नागपूर यांनी हे कंत्राट घेतले आणि कामाकडे पाठव फिरविली.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
साधा करारनामा करून द्यायला आणि कागदपत्रे द्यायला महाशयाना नोटीस द्यावी लागली. मार्च 2021 ला करारनामा होऊन तीन महिन्यात काम पूर्ण करण्याची नियमानुसार अट स्वीकारली. आज एक वर्ष होऊन ही टाकीचा फक्त मांडव उभा झाला आहे. उन्हाळा तोंडावर आला आहे आणि या उन्हाळयात पाणी पुरवठा साठी सदर टाकी उपयोगी येईल याची अजिबात शक्यता नाही.त्यामुळे सारंगापूर वासियांनी असंतोष व्यक्त केला आहे.

कंत्राटदाराला नगर पंचायत ने वारंवार नोटीसी बजावल्या पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. पाईप लाईन आणि पाणी टाकी उभारण्या साठी एकदा नगर पंचायत ने मुदतवाढ दिली पण दिलेल्या मुदतवाढीत ही काम पूर्ण झाले नाही. जर मुद्दतीत काम पूर्ण झाले नाही तर प्रति दिवस विशिष्ट रक्कम दंड आकारला जातो आणि सदर कंत्राट दाराला काळ्या यादीत टाकले जाते. आता नगर पंचायत यावर काय करवाई करते याकडे सारंगापूर वासियांचे लक्ष लागले आहे.
 पाण्याची टाकी बांधकाम हे जोखमीचे असल्याने त्यासाठी प्रमाणित काँक्रीट सिमेंट वापरणे गरजेचे असताना ठेकेदार मात्र याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. पाईप लाईन चे पाईप हे कंपनी कडून दर्ज्याचे आहेत असे प्रमाणपत्र घेऊन ते प्रमाणपत्र कार्यालयाला देने बंधनकारक आहे. त्याशिवाय देयक काढता येत नाही. पण याचीही आवश्यकता कंत्राटदाराला वाटली नाही.

त्यामुळे सदर कामाची चौकशी करून सदर कंत्राटदाराला यापुढे कोणतीही मुदतवाढ़ न देता करारनाम्या नुसार दंड आकारून सदर कंत्राट दाराला काळ्या यादीत टाकावे आणि नव्याने निविदा काढून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष पुष्पा नैताम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad