Type Here to Get Search Results !

धामणी विविध कार्यकारी सेवा संस्थेवर म्हाळसाकांत ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व






धामणी (ता.आंबेगाव ) सोसायटीचे नवनिवार्चात संचालक आनंद साजरा करताना.

लोणी,धामणी : प्रतिनिधी =कैलास गायकवाड

ता.९/३/२०२२आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील संवेदनशील व राजकीय दृष्टीने महत्वाची असणारी धामणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत एकूण १३ जागेवर सर्व पक्षीय म्हळासाकांत ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व राहिले आहे.


 

ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर गावातील सर्व पक्षीय प्रमुख कार्यकर्ते (३१ जानेवारी)ला पंचांच्या पारावर एकत्र आले.खंडोबाचा भंडार उधळून विविध विकास सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय गावाने एकमताने घेतला होता मात्र १३ जागांपैकी फक्त ५ जागा बिनविरोध झाल्या व सर्वसाधारण गटातील ८जागांसाठी ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले.महादू शंकर जाधव यांनी ९ वा अर्ज दाखल केल्याने रविवार (दि: ६) रोजी खेळी मेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली .


 

बिनविरोध निवडुन आलेल्या ५ जागा खालील प्रमाणे महिला राखीव-शांताबाई बोऱ्हाडे, सुमन जाधव,इतर मागास प्रवर्ग-रामदास विधाटे,मागास प्रवर्ग-सुधाकर जाधव,भटक्या विमुक्त प्रवर्ग -दीपक जाधव महाविकास आघाडी सह सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी प्रथमच एकत्र येत वाड्या वस्त्यांवर जाऊन जोरदार प्रचार केला व म्हळासाकांत ग्रामविकास पॅनेलचे सतीश जाधव, कोंडीभाऊ तांबे,जयदीप चौधरी,बाळासाहेब बढेकर,सुहास रणपिसे, संजय जाधव,बाळासाहेब बोऱ्हाडे,रंगनाथ जाधव आठही उमेदवार निवडून आले तर अपक्ष महादू शंकर जाधव यांचा दारुण पराभव झाला.


 

विजयी उमेदवारांचा सत्कार माजी सरपंच गजाराम जाधव, शरद सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब जाधव,पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेलें,सरपंच सागर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेलें,जेष्ठ,सरपंच सागर जाधव ,भीमाशंकर शिक्षण संस्थेचे सचिव वसंतv जाधव ,माजी उपसरपंच सतीश जाधव,पाणलोट समिती सचिव सुभाष गुलाब जाधव,आनंद जाधव,वामन जाधव,गणेश तांबे,माजी उपसरपंच मनोज तांबे,निलेश रोडे,अक्षयराजे विधाटे,संतोष रणपिसे,रामदास जाधव ,मयूर सरडे, अविनाश बढेकर ,सोमनाथ जाधव यांनी एकत्र येत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad