Type Here to Get Search Results !

बिर्ला कार्बन कंपनीने साजरा केला. जागतिक महिला दिन

बिर्ला कार्बन कंपनीने साजरा केला. जागतिक महिला दिन


 प्रतिनिधी :- लक्ष्मण पवार

बिर्ला कार्बन इंडिया व हायटेक जनसेवा ट्रस्ट पाताळगंगा यांच्या वतीने जागतिक महिला दिन नुकताच संपन्न झाला. बिर्ला कार्बन कंपनी व ट्रस्ट सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम पार पाडत असतात.



 त्याचबरोबर दरवर्षी महिलांसाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.यावर्षी सुद्धा जागतिक महिला दिन विविध क्षेत्रातील जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या सन्माननीय महिलांच्या उपस्थित मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. 


कार्यक्रमाची सुरुवात सन्माननीय व्यासपीठावरील महिलांच्या शुभहस्ते मंगलमय दीप प्रज्ज्वलन करुन सुमधुर अशा स्वागतपद्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मनाला जेव्हा नव्या उमेदीचे पंख फुटतात जेव्हा पारतंत्र्याच्या शृंखला तुटल्या जातात आणि नव्या उमेदीला बहर येऊ लागतो तेव्हा मन पाखरू बनतं..
आकाशाला गवसणी घालण्यासाठी आतुर झालेलं हे मन मग रुढी,परंपरेच्या जोखडातून मुक्त होतं. आनंदाच्या भरात घरात कैद असणारी ती भगिनी स्वातंत्र्याच्या नव्या परिसिमा रचते. तिला आकाश देखील ठेंगणे वाटते आणि नकळत तिच्या ओठी लतादीदींचे १९५६ सालचे अजरामर गीत बाहेर पडते.पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मे आज मै आजाद हू दूनिया की चमन में असे महिला दिनाला साजेसे सुश्राव्य सामुहिक गीत सरनौबत नेताजी पालकर विद्यालयाच्या शिक्षिका यांनी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. 


कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख श्री प्रकाशजी देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात स्ञी-पुरुष समानता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांना विविध क्षेत्रात संधी देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे गरजेचे आहे. त्या हेतूनेच कंपनी परिसरातील शिक्षण,आरोग्य,व सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा गौरव करत आहोत.यावेळी कंपनीचे युनिट हेड हनुमानजी गुप्ता, अभियांत्रिकी विभाग प्रमुख पवन कुमार झा, मानव संसाधन विभाग प्रमुख प्रकाशजी देसाई, सी.एस.आर.प्रमुख लक्ष्मण मोरे यांनी नव्वद महिलांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.आणि समस्त महिला वर्गाचे उद्बोधन व्हावे. यासाठी प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रेखा डावर यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित गेले होते त्यांनी स्त्रियांच्या आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. गृहिणी म्हणून घरात काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक उपकरणे कशाप्रकारे हाताळावीत याविषयी डी.सी.कट्टी यांनी मार्गदर्शन केले तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी याविषयी भारत गॅस एजन्सी यांच्या प्रतिनिधींकडून प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. कंपनीचे युनिट हेड हनुमानजी गुप्ता यांनी आपले विचार व्यक्त करत असताना पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या कार्यक्षेत्रात देखील महिला कार्यरत असल्याचे उदाहरणादाखल स्पष्ट केले. खालापूर तहसीलदार सन्माननीय कल्याणी कदम- मोहिते, विद्या प्रसारिणी सभा चौक कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कंपनीने राबविलेल्या अशा या उपक्रमाचे महिलांनी मनापासून कौतुक करून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी डॉ.सीमा पाईकराव (वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र लोहोप) वडगाव ग्रामपंचायत सरपंच गौरी गडगे, इसांबे ग्रामपंचायत सरपंच पल्लवी देवघरे, सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक सर्व शिक्षिका, तळवली अंगणवाडी सेविका, सारंग अंगणवाडी सेविका, सारंग, चौक,माजगाव, मोहपाडा केंद्र शाळेतील शिक्षिका, प्रोडक्शन हेड विजय अग्रवाल श्री सचिन कंदळे,श्री हरीश रावत, कंपनीतील व्यवस्थापक व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता खोत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री लक्ष्मण मोरे व निकिता कोळी यांनी केले तद्नंतर स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad