Type Here to Get Search Results !

आर्णी तालुक्यातील घटना आयता येथे गॅसचा स्फोट,गरोदर महिलेसह आठ वर्षाच्या मुलीचा ही होरपळून मृत्यू

आर्णी तालुक्यातील घटना आयता येथे गॅसचा स्फोट,गरोदर महिलेसह आठ वर्षाच्या मुलीचा ही होरपळून मृत्यू




यवतमाळ प्रतिनिधी :- संजय जाधव



सावळी सदोबा: आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा लगत असलेल्या मौजा आयता या गावांमध्ये आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घरगुती गॅसने पेट घेतला असता,मोठ्या प्रमाणात आग लागली,


आगीने रुद्ररूप धारण केले होते,आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली होती की,ज्या घरात आग लागली होती,त्यामध्ये गरोदर महिलांची व लहान मुलगी या कुणालाही बाहेर येता आले नाही,तेवढ्या वेळामध्ये गॅसचा स्पोट झाल्याने,गरोदर महिला सौ.काजल विनोद जयस्वाल वय ३०वर्ष,व मुलगी परी विनोद जयस्वाल वय ८ वर्ष या दोघींचा घरामध्येच होरपळून मृत्यू झाला,आग एवढ्या मोठ्या प्रमाणात लागली असतांना,गावातील लोकांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता आग विजवण्यासाठी प्रयत्न केले,आग विझवताना अनेक लोकांना किरकोळ इजा झाल्या,तोपर्यंत विनोद जयस्वाल यांच्या कुटुंबाची राखरांगोळी झाली होती,घरामध्ये संसार उपयोगी असलेली एकही साहित्य शिल्लक राहिलेले नव्हते,या आगीमुळे गावात भीतीचे वातावरण झाले होते,गावात ज्यां कुटुंबाच्याकडे गॅस आहे,त्यांनी आपल्या गॅस गावाबाहेर आणुन ठेवले होते,आग विझवण्यासाठी अग्निशामक यांचा गाडी येवो पर्यंत आग नियंत्रणात आली होती,


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad