Type Here to Get Search Results !

आंबेगाव | अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

लोणी-धामणी : . दिः१८/०३/२०२२. वडगावपीर (ता. आंबेगाव ) येथे शुक्रवार ( दिः१८) ते शुक्रवार( दिः२५) या काळात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. 




या काळात दररोज पहाटे ४ ते ६ वाजता काकड आरती, अखंड विनावादन, सकाळी ७ ते ११ वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ६ वाजता प्रवचन,६ ते ७ वाजता हरिपाठ,९ ते ११ वाजता हरिकिर्तन, रात्री ११ नंतर हरिजागर. अखंड हरिनाम सप्ताह काळात दररोज ह.भ.प. नाथा महाराज गव्हाणे यांचे प्रवचन होईल. तर शुक्रवार (दिः१८) रोजी ह.भ.प. बबन महाराज सिनलकर (लोणी) यांचे किर्तन झाले तर शनिवार (दिः१९) पासून अनुक्रमे ह.भ.प. सुभाष महाराज लबडे ( जारकरवाडी ),तुकाराम बिजे निमित्त सकाळी ह.भ.प.सोपान महाराज लासलगांवकर ( आळंदी),व ह.भ.प. नाथा महाराज गव्हाणे ( भोसरी ),ह.भ.प. वैभव महाराज शिंदे (नागापूर ),ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज करंजीकर ( आळंदी), एकानाथ षष्ठी निमित्त सकाळी ह.भ.प.मच्छिद्र महाराज राजगुडे (ठाणे ) व ह.भ.प. अभिषेक महाराज आदक ( भोसरी), ह.भ.प. विष्णू महाराज खांडेभराड (आळंदी) व शुकवार (दिः२५) रोजी सकाळी ८ ते १० वाजता ह.भ.प. एकनाथ महाराज सत्तरशास्त्री (परभणी) यांचे काल्याचे किर्तन होईल.

या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी वडगावपीर यांनी केले आहे.अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad